स्टोरी

गुरुपौर्णिमा विशेष!

Spread the love

३ जुलै वार्ता: हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आध्यात्मिक आणि शैक्षणिक मार्गदर्शकांप्रति अर्थात आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा हा विशेष दिवस साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. याच दिवशी महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला. महर्षी वेद व्यास ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यामुळेच गुरूपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असे म्हणतात.

यावर्षी गुरुपौर्णिमा दि. ३ जुलै रोजी सर्व ठिकाणी साजरी होत आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढ शुक्ल पक्षाची पौर्णिमा काल रविवार २ जुलै रोजी रात्री ८.२१ वाजता सुरू झाली आणि सोमवार ३ जुलै रोजी संध्याकाळी ५. ०८ वाजता समाप्त होणार आहे. या दिवशी हिंदू धर्मात अनेक विधी, परंपरा पाळल्या जातात. गुरुपौर्णिमेला मंदिरे, आश्रम आणि शैक्षणिक संस्थांमध्ये वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.


Spread the love

Related posts

सावंतवाडीत शौर्य दिननानिमित्त भिमा कोरेगावच्या शूरवीरांना मानवंदना…!

news

म्हसळयांत बिबट्याचा संचार! मालकी जागेत जागो-जागी लागणारे वणवे ठरत आहेत कारण.

news

प्राथमिक शिक्षक संघाचे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी…!

news

Leave a Comment