स्टोरी

खासदार उदयनराजे भोसले आणि राज्‍य शासनाच्‍या सहकार्यातून महारोजगार मेळाव्‍याचे आयोजन….

Spread the love

२२ मे वार्ता: सातारा येथे खासदार उदयनराजे भोसले यांचा पुढाकार आणि संकल्‍पनेतून आयोजित महारोजगार मेळाव्‍यात पहिल्‍याच दिवशी ७६२ जणांना ऑन दि स्‍पॉट नोकरीचे नियुक्तिपत्र देण्यात आले. दोन दिवसीय मेळाव्‍यात ५ हजार ६०० जणांची नोंदणी झाली असून, त्‍यापैकी ३ हजार ९०० जणांच्‍या पहिल्‍याच दिवशी मुलाखती झाल्‍या. साताऱ्याच्‍या विकासाला चालना मिळावी, यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्‍या संकल्‍पनेतून इनोव्‍हेटिव्‍ह सातारा हा उपक्रम राबविण्‍यात येत आहे. याचाच एक भाग म्‍हणून आठ दिवसांपूर्वी केंद्रीय सूक्ष्‍म-लघू-मध्‍यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्‍या उपस्‍थितीत साताऱ्यात उद्योग परिषद झाली. यानंतर खासदार उदयनराजे भोसले आणि राज्‍य शासनाच्‍या सहकार्यातून यशोदा टेक्‍निकल कॅम्‍पस येथे दोन दिवसीय महारोजगार मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे.

या मेळाव्‍याचे उद्‌घाटन आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्‍ते झाले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक समीर शेख, माजी आमदार आनंदराव पाटील आदी मान्‍यवर उपस्‍थित होते. मेळाव्‍याच्‍या पहिल्‍याच दिवशी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील युवकांनीही मोठी गर्दी केली होती. युवकांच्‍या नावनोंदणीसाठी स्‍वतंत्र कक्ष उभारण्‍यात आला होता. यात दिवसभरात ५ हजार ६०० युवक-युवतींची नोंदणी झाली.


Spread the love

Related posts

निवतिबंदर येथील महाविष्णु मंदिराचा 24 पासून वर्धापन दिन सोहळा!

प्रसाद परब

छत्रपती शिवरायांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित करावे !खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन केली मागणी!

news

कोकण रेल्वे मार्गावरील २४ तासानंतर हि पूर्वपदावर नाहीच.

news

Leave a Comment