स्टोरी

निवतिबंदर येथील महाविष्णु मंदिराचा 24 पासून वर्धापन दिन सोहळा!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: निवतीबंदर येथील श्री महाविष्णु मंदिराचा व्दितीय वर्धापन दिन सोहळ्या निमित्त २४ ते २६ मार्च या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २४ रोजी सकाळी ८ वा. हरिपाठ, सायं. ५ वा. ग्रामस्थांची भजने, ६ वा. श्री पावणादेवी समईनृत्य किंजवडे यांचे समई नृत्य , रात्री ९ वा. महापुरुष महिला भजनमंडळ तारकर्ली यांचे भजन. बुधवार दि. २५ मार्च रोजी पहाटे५ ते सकाळी ६ श्री देव महाविष्णु अभ्यंग स्नान , लघुरुद्र, अभिषेक वयथासान्ग पूजन, भाविकांसाठीश्रीचे दर्शन, १०वा. हरिपाठ, दुपारी२ वा. श्रीसत्यनारायणाची महापुजा,सायं. ६ ते ८ वा. ग्रामस्थांची भजने,रात्रौ ९ वा. जयहनुमान दशावतारनाट्यमंडळ मोचेमाड यांचा दशावतारी नाट्यप्रयोग. गुरुवार दि.२६ मार्च रोजी पहाटे ५ वा. काकडआरती, दुपारी ११-३० वा. ग्रामस्थभजन, १२ वा. रामजन्म आरती,१२-३० वा. महाप्रसाद, सायं. ५ वा.हरिपाठ, ७ वा. श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, किर्लोस यांचे दिंडी भजन, रात्रौ ९ वा. सातेरीमहिला दशावतार मंडळ, पावशी,कुडाळ यांचा दशावतारी नाट्य प्रयोग ‘भक्तांची पाठिराखी आदिमाया’ या सर्व कार्यक्रमांना उपस्थितीचे आवाहन विष्णुमंदिर समितीने केले आहे.


Spread the love

Related posts

कलंबिस्त ते शिराशिंगे रस्ता डांबरीकरण करण्यासाठी ग्रामस्थांचे बांधकाम कार्यकारी अभियंत्यांना निवेदन…!

news

रेल्वेने प्रवास करतांना सामानाचे दायित्व हे प्रवाशांचेच असणार! सर्वोच्च न्यायालय

news

जालियनवाला बागेतील नृशंस हत्याकांड !

news

Leave a Comment