स्टोरी

विजयनगर प्रभागातील निराधार महिलांना विनामुल्य शिलाई मशीनचे वाटप! मा. नगरसेविका शितल मंढारी यांच्या प्रयत्नांना यश…

Spread the love

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड):

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कल्याण पूर्व, विजय नगर प्रभाग क्र . ९८ च्या माजी नगरसेविका श्रीमती शितल मंढारी यांच्या प्रयत्नाने प्रभागातील १२ निराधार महिलांना विनामुल्य शिलाई मशीनचे वाटप करण्यात येवून या महिलांना रोजगाराचे साधन उपलब्प करून देण्यात आले आहे. शितल मंढारी यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरीकांकडून कौतुक होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण खात्याच्या महिला व बाल विकास विभागा मार्फत समाजातील विधवा व निराधार महिलांना रोजगार उपलब्द करून देण्यात येत असतात. याच उपक्रमा अंतर्गत ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत असलेल्या महिला व बाल विकास विभागा अंतर्गत विजय नगर प्रभागातील विधवा व निराधार पात्र महिलांना शिलाईचे प्रशिक्षण देण्यात आले होते.

या प्रशिक्षित महिलांना रोजगार उपलब्द होण्यासाठी त्यांना समाज कल्याण विभागामार्फत विजय नगर प्रभाग क्र ९८ मधील या महिलांना नवीन शिलाई मशिनचे माजी नगरसेविका श्रीमती शितल मंढारी यांचे हस्ते वाटप करण्यात आले. शितल मंढारी यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरीकांकडून कौतुक करण्यात येत आहे.


Spread the love

Related posts

आंबोली गावात जंगली हत्तीची दहशत.

news

जालियनवाला बागेतील नृशंस हत्याकांड !

news

१३ जानेवारी रोजी मसुरे केंद्र शाळेचे स्नेहसंमेलन…!

news

Leave a Comment