स्टोरी

१३ जानेवारी रोजी मसुरे केंद्र शाळेचे स्नेहसंमेलन…!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मसुरे येथील श्री दाजी साहेब प्रभू गावकर केंद्र शाळा मसुरे नंबर एक या शाळेचे स्नेहसंमेलन शनिवार दिनांक 13 जानेवारी रोजी विविध उपक्रमाने होत आहे. यावेळी सकाळी साडेनऊ वाजता ईश स्तवन, स्वागत, प्रास्ताविक, हस्तलिखित प्रकाशन, बक्षीस वितरण, मान्यवरांचे सत्कार समारंभ. सायंकाळी पाच वाजता स्नेहसंमेलन उद्घाटन आणि श्री दाजी साहेब प्रभुगावकर केंद्र शाळा मसुरे नंबर एक च्या विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन पर सांस्कृतिक कार्यक्रम. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संग्राम प्रभू गावकर, उद्घाटक संदीप हडकर, प्रमुख पाहुणे सरोज परब, विशेष मान्यवर राजेश गावकर, महेश बागवे, सौ गायत्री ठाकूर,श्री संजय माने, श्री नारायण देशमुख, श्री दत्तप्रसाद पेडणेकर, सौ लक्ष्मी पेडणेकर, सन्मेष मसुरेकर, धनंजय सावंत, शिवराज सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन या प्रशालेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका शर्वरी सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ शितल मसुरकर आणि केंद्रशाळा मसरे नंबर एक च्या वतीने करण्यात आलेले आहे.


Spread the love

Related posts

वाचन संस्कृती जपणाऱ्या कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयाचे रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण.! ५ ऑक्टोबर रोजी साजरा होतोय वर्धापनपनदिन.

news

कवी दीपक पटेकर (दीपी) यांच्या “बकुळीची फुले” काव्यसंग्रहाचे रविवारी २९ मार्च रोजी होणार प्रकाशन.

प्रसाद परब

साप्ताहिक सुट्टयांमुळे अक्कलकोट वटवृक्ष मंदीरात स्वामींच्या दर्शनाकरीता प्रचंड गर्दी!

news

Leave a Comment