स्टोरी

उद्या रविवार दि.८ रोजी कलंबिस्त वाचनालय येथे दिवाळी अंक प्रदर्शनाचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त वाचनालय व कला क्रीडा मंडळ च्या कार्यकारणीची बैठक उद्या रविवार आठ नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता वाचन मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये विविध दिवाळी अंक वाचकांसाठी खुले ठेवण्यात आले आहेत. सर्व दिवाळी अंकांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून दिवाळी अंकांचे दर्शन घ्यावे, त्यांचे वाचन करावे आणि या आनंदात सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

दिवाळी अंक घरी वाचनासाठी नेण्याबाबत संचालक मंडळाचा निर्णय: ग्रंथालयाचे सभासद असलेल्या वाचकांनी अंक घरी नेण्यासाठी ग्रंथालयात रु. 50/- देणगीमूल्य जमा करावे.जे ग्रंथालयाचे सभासद नाहीत, अशा वाचकांना अंक घरी वाचनासाठी त्याची सुविधा ठेवण्यात आली आहे. जेव्हा वाचक दिवाळी अंक परत करेल, त्यावेळी जमा केलेली अंकाची बाजारमूल्य रक्कम त्या वाचकास परत करण्यात येईल. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष ॲड संतोष सावंत, सचिव रूपा सावंत, खजिनदार रमेश सावंत व आदी संचालक मंडळ यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे उदघाट्न सरपंच सपना सावंत यांच्या हस्ते होणार आहे.


Spread the love

Related posts

मॉरिशसमध्ये गाजले मालवणी गारहाणे….!

news

धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेना पक्षाच्या वतीने दिवाळीचा शिधा घेऊन जाणाऱ्या २४ वाहने रवाना.

newss

मुख्यमंत्री ‘योगी आदित्यनाथ’ यांच्या हस्ते ‘रमेश शिंदे’ ‘सांस्कृतिक योद्धा पुरस्कार २०२३’ ने सन्मानित!

news

Leave a Comment