स्टोरी

गोव्यावरून आलेल्या निराधार आजीला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने दिला आधार.

Spread the love

सावंतवाडी (रवी जाधव): मुल चांगली शिकली नोकरीला लागली आणि एक दिवशी लग्न करू आप आपल्या मार्गाला गेली. अशा त्या मुलांना एक आई कित्येक दिवस शोधत आहे. आज ती गोव्यावरून शोधत शोधत सावंतवाडीला आली परंतु आजही त्या मुलांचा पत्ता त्या आईला सापडला नाही. समाजामध्ये असे किती आई-वडील असतील ज्यांनी जन्मदात्यालाच वाऱ्यावर सोडून जीवन सुखाने जगत आहेत ही आजची वस्तुस्थिती आहे. या नऊ वर्षांमध्ये सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यकर्त्याने असे अनेक प्रसंग जवळून पाहिलेत आणि हाताळलेत सुद्धा आणि जेव्हा एखादा निराधार रस्त्यावर भटकत डोळ्यामध्ये अश्रू घेऊन कुणाचातरी शोध असतो तेव्हा अशा निराधाराला सापडते ती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान. आज पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रूपाली मुद्राळे, हेलन निबरे व रवि जाधव यांनी श्रीमती कमलावती हुबलेकर वय वर्ष 76 फोंडा गोवा येथून येऊन सावंतवाडी बाजारपेठेमधील आरोग्य भुवन येथे रडत बसली होती ते पिंगुळकर नामक एका व्यक्तीने पाहिलं व त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव रूपा मुद्राळे व हेलन निभरे घटनास्थळी आले. तिला फिरविला आणि त्यानंतर पोलिसांची मदत घेऊन काल तिला सविता आश्रम या सेवाभावी आश्रमाचा आधार दिला.


Spread the love

Related posts

श्रीमती बनुताई पै ग्रंथालयातर्फे स्वातंत्र्यदिनी देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन.

news

मुणगे कातकरी वस्तीत ब्लॅंकेट वाटप.

news

बिपरजॉय चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता.

news

Leave a Comment