स्टोरी

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने जिल्ह्यास्तरीय वाचक स्पर्धा आयोजन

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने प्रतिवर्षप्रमाणे तालुका ग्रंथालयाच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यास्तरीय वाचक स्पर्धा आयोजित कण्याचे आले आहे. अशी माहिती जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के यांनी स्पष्ट केलेतालुका ग्रंथालयाच्या वतीने तालुकास्तरावर ही स्पर्धा होईल. स्पर्धक संबधीत तालुक्यातील कोणत्याही ग्रंथालयाचा वाचक असावा. तालुका स्तरावरील अनुक्रमे तीन विजेत्यां स्पर्धकांना जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग मिळेलया मधून अनुक्रमे पाच क्रमांकांना रोख रु. १०००/-, रु. ७००/-, रु. ५००/-, रु. ३००/-, रु. २००/- आणि प्रशस्तीपत्र अशी पारितोषिके दिली जातील. ही स्पर्धा आयोजना बाबत आवश्यक ते मार्गदर्शन जिल्हा ग्रंथालय संघाचे आपल्या तालुक्यातील जिल्हा संघ प्रतिनिधि करतील. जिल्हा स्तरीय स्पर्धा रविवार दि. ०६ डिसेंबर २०२६ रोजी राव बहाददूर अनंत शिवाजी देसाई (टोपीवाले) वाचनालय व ग्रथसंग्रहालय (जिल्हा ग्रंथालय), कुडाळ, येथे सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. जिल्हा स्तरीय स्पर्धेचा विषय श्रीम. कुमुद गजानन रेगे यांची कोणतीही साहित्यकृती. (वेळ १० मिनिटे) राहील. तालुका ग्रंथालयाणी ०६ डिसेंबर २०२६ पूर्वी तालुका स्पर्धा घेवून विजेत्या तीन क्रमांकाची नांवे जिल्हास्तरिय स्पर्धेसाठी पाठवावायची आहेत.

स्पर्धेच्या आयोजना बाबत जिल्हा ग्रंथालय संघाच्या जिल्हा प्रतिनिधींशी संपर्क साधावा. कुडाळ : श्री जयेंद्र तळेकर ७५८८९०१९८३ राजन पांचाळ ९४२३०२६७३५, कणकवली श्री धाकू तानवडे – ९४२११४७८६८. सावंतवाडी व दोडामार्ग श्री. भरत गावडे-९४०३०८७७९६, श्री. विठ्ठल कदम ९८२३०४८१२६, अॅड. संतोष सावंत ९४२३०५१५३०. वेंगुर्ला श्री. महेश बोवलेकर ९४२३३००७४४, श्री. गुरुनाथ मडवळ ९४२३३०९५५५, श्री. नंदन वेंगुर्लेकर- ९४२२४३४३५६. मालवण श्री. रुजारियो पिंटो ९४२२०५४६००, श्रीम. ऋतुजा केळकर ९४२०४२३७९०, श्री. संजय शिंदे – ९४२२२३४९५०.

स्पर्धकांसाठी साहित्यिका श्रीम. कुमुद रेगे यांचे आई, उर्वशी, कालचक्र, गंधार, घरकुल, नंदादीप, नकोशी, नियती, निसर्गकन्या प्राजक्त, भैरवी, मनस्विनी, मैत्री, वृंदा, बहाददूर अनंत शिवाजी देसाई वेगळ्या वाटेने जाताना, सखी, सावत्रबाप साहित्य राव वाचनालय (जिल्हा ग्रंथालय), कुडाळ येथे उपलब्ध आहेत.असे सचिव राजन पांचाळ यांनी आवाहन केले आहे


Spread the love

Related posts

राज्यातील २० सहस्र शाळांमध्ये अग्नीशमन यंत्रणा नाही! शिक्षणमंत्री दिपक केसरकर

news

जागतिक व्यासपिठावर भारताची बाजू समर्थपणे मांडणारे प्रसिद्ध पाकिस्तानी लेखक तारेक फतेह यांचे निधन

news

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर व्यापारी व नागरिक हैराण – रूपा मुद्राळे

newss

Leave a Comment