स्टोरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवाळी साजरी करण्यासाठी थेट शेतकरी रामभाऊ बालपांडेंच्या निवासस्थानी मुक्कामाला.

Spread the love

नागपूर: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शक्य तिथे विंधन विहिरी घेण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा या गावात शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करून दिवाळी साजरी केली. शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी मुक्काम केला. शेतकऱ्यांसमोरील संकट आणि या संकटावर कशी मात करता येईल, या संदर्भात त्यांनी बालपांडे यांच्यासोबत संवाद साधला. चिंताग्रस्त शेतकऱ्यांना त्यांनी धीर दिला. हवामान बदलामुळे काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली त्यानंतर पाऊसच पडला नाही आणि अद्यापही पाऊस नसल्यामुळे शेतातील पिकांची हानी झाली आहे. या दोन्ही प्रसंगांमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मदत दिली जात आहे. काटोल, नरखेड परिसरात संत्र्यासह मोसंबीचे मोठ्या प्रमाणात पीक होत आहे. परंतु, बांगलादेशने निर्बंध घातल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. या संदर्भात मिहान येथे मोठा प्रकल्प सुरू होत असून या पिकांवर प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांना संधी उपलब्ध होणार आहे .शेतकरी अडचणीत येणार नाही, त्याची खबरदारी घेण्यात येत आहे. रब्बीचे पीक वाचवण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, या संदर्भातही शेतकऱ्यांसोबत चर्चा केली.

शेतकऱ्यांच्या लहान बाळाला खेळवतांना मुख्यमंत्री
शेतकऱ्यांच्या घरी जेवतांना मुख्यमंत्री

शेतीच्या संरक्षणासाठी कुंपण घालण्याची योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.शेतकऱ्यांच्या दुःखांमध्ये सहभाग घेऊन दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री आमच्या घरी आलेत सोबत मुक्काम केला तसेच आमच्या घरच्या चटणी भाकरीचा आस्वाद घेतला, याचा आम्हाला अभिमान वाटला, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जो धीर दिला त्यामुळे आम्हाला संकटावर मात करण्याची हिंमत मिळाली, अशी भावना रामभाऊ बालपांडे यांनी व्यक्त केली.


Spread the love

Related posts

सीवूड्स जेटीतील युवा उद्योजिकेच्या कॅफेवर कथित दबाव?

newss

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणार्‍या अनिल जयसिंघानी याची ३.४० कोटींची मालमत्ता जप्त!

news

मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस “शैलेंद्र पेडणेकर” वाढदिवस विशेष

news

Leave a Comment