स्टोरी

धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेना पक्षाच्या वतीने दिवाळीचा शिधा घेऊन जाणाऱ्या २४ वाहने रवाना.

Spread the love

मुंबई: धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेना पक्षाच्या वतीने दिवाळीचा शिधा घेऊन जाणाऱ्या २४ वाहनांना आज भगवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. राज्यावर दुष्काळाचे गंभीर संकट ओढावले असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अशा संकटाच्या काळात सरकारची मदत शेतकऱ्यांना मिळेलच, पण सरकारसोबत शिवसेनाही त्याच ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेऊन हा शिधा रवाना केला असल्याचे यावेळी सांगितले.या शिध्यामध्ये बेसन, साखर, रवा, मैदा, तूप, रांगोळी, पणत्या आणि शिवसेनेने प्रकाशित केलेल्या खास दिनदर्शिकेचाही समावेश असणार आहे. दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांनाही दिवाळीचा सण आनंदाने साजरा करावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.शेतकरी संकटात असताना त्याला नाडता कामा नये. कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास होऊ देऊ नका. असा त्रास होत असेल तर सरकार, प्रशासन किंवा शिवसेना संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करेल असेही याप्रसंगी बजावले.यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार ओमराजे निंबाळकर, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, नगरसेवक राकेश शिंदे, युवासेना मराठवाडा समन्वयक बाजीराव चव्हाण तसेच शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.


Spread the love

Related posts

तांबुळी केंद्रशाळेत मूल्यवर्धन विशेष शिक्षण परिषद उत्साहात संपन्न.

newss

‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची निर्मिती मच्छिमरांनी समुद्रात जावू नये! निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे.

news

राज्यशासन ‘शिक्षणाचा हक्क’ कायद्यामध्ये सुधारणा करणार! शिक्षणमंत्री दिपक केसरकर

news

Leave a Comment