स्पोर्ट

मळगाव येथील सानिका संजय गोसावी बॉक्सिंगमध्ये प्रथम तर किक बॉक्सिंग आणि कराटे या दोन्ही प्रकारात द्वितीय.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: येथील राणी पार्वती देवी हायस्कूल येथील इयत्ता बारावी शिकणारी मळगाव येथील सानिका संजय गोसावी हिने ओरोस येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत तिहेरी यश संपादन केले आहे. १९ वर्षांखालील मुलींच्या गटात ५० किलो वजनी गटात तिने बॉक्सिंगमध्ये प्रथम क्रमांक, तर किक बॉक्सिंग आणि कराटे या दोन्ही प्रकारात द्वितीय क्रमांक पटकाविला. तिच्या या यशामुळे मळगाव गावासह सावंतवाडी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिने यापूर्वी राज्यस्तरावरही गेल्या जानेवारी महिन्यात किक बॉक्सिंग मध्ये यश मिळवले होते. तिला आता पुढे राष्ट्रीय स्तरावर कामगिरी करून दाखवण्याची इच्छा आहेसानिका ही सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूलची विद्यार्थिनी असून इयत्ता बारावीत ती कला शाखेत शिक्षण घेत आहे.

तिला कराटे प्रशिक्षक किरण देसाई यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यापूर्वी झालेल्या महाराष्ट्र कराटे चॅम्पियनशिप या राज्यस्तरीय स्पर्धेतही सानिकाने दोन कांस्यपदके पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि सरावाच्या जोरावर तिने क्रीडा क्षेत्रात ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सानिकाच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्यावतीने तिचे अभिनंदन करण्यात आले असून मळगाव गावातूनही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे प्रशिक्षक किरण देसाई यांचे तिला मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशामुळे गावाच्या नावलौकिकात भर पडली आहे. सानिकाने भविष्यातही अशीच यशस्वी वाटचाल करून उच्चस्तरीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करावी, अशाप्रकारे तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.


Spread the love

Related posts

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजा याचा ‘पंच’, ऑस्ट्रेलियाला फिरकीवर नाचवलं

प्रसाद परब

ए.आय.एस.एस.एम.एस. अभियांत्रिकी महाविद्यालयात महिलांसाठी विशेष स्वसंरक्षण प्रशिक्षण सत्राचे आयोजन.

news

सत्यम इंटरनॅशनलच्या वतीने फुटबॉल स्पर्धेचे आयोजन.

news

Leave a Comment