स्टोरी

पीएम किसान योजनेच्या २४ व्या हफ्त्याचे वितरण

Spread the love

मुंबई: पीएम किसान योजनेच्या २४ व्या हफ्त्याचे वितरण आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते गुजरात राज्यातील बनासकांठा येथे पार पडलेल्या विशेष कार्यक्रमाद्वारे करण्यात आले. या कार्यक्रमाला दुकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित राहून सहभाग घेतला.पीएम किसान योजनेचा २४ व्या हफ्त्याचे देशातील सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे थेट वितरण करण्यात आले. यात राज्यातील ९१ लाख १२ हजार ७६६ शेतकऱ्यांना १ हजार ८३५ कोटी रुपयांच्या हफ्त्याचे वितरणही करण्यात आले असून, राज्यातील दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळालेल्या या हफ्त्यामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि खासदार, आमदार आणि लाखो देशवासीय आवर्जून उपस्थित होते.


Spread the love

Related posts

मुंबई – गोवा महामार्गावरील पावशी येथे कार व दुचाकीत अपघातात एकाचा मृत्यू! तर एक गंभीर….

news

श्री गणेशमूर्ती स्थापना १९ सप्टेंबर २०२३ या दिवशीच करा ! – ‘दाते पंचांग’कर्ते मोहन दाते

news

निवृत्त शिक्षक विश्वकांत गणपत यांची तब्येत खालावली.! सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हा रुग्णालयात दाखल.

news

Leave a Comment