कल्याण | प्रतिनिधी | ३ नोव्हेंबर २०२६(सुधीर गुजर): कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण गोसावी यांची कल्याण लोकसभा परिसराच्या जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख शरद शिवाजी पाटील यांनी २ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिकृत नियुक्तीपत्र देऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली.शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार तसेच कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख वरुण सरदेसाई यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद आहे.एक वर्षासाठी नियुक्ती; संघटनात्मक कामकाजाची जबाबदारीनियुक्तीपत्रानुसार प्रवीण गोसावी यांच्यावर कल्याण लोकसभा परिसरातील जिल्हा समन्वयकपदाची जबाबदारी एक वर्षाच्या कालावधीसाठी सोपविण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात समन्वय राखणे, कार्यकर्त्यांना एकत्रित करणे आणि पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविणे, या दृष्टीने त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
नियुक्तीपत्रात पाच महत्त्वाच्या सूचनाजिल्हाप्रमुख शरद शिवाजी पाटील यांनी नियुक्तीपत्राद्वारे प्रवीण गोसावी यांना संघटनात्मक कामकाजाबाबत पुढील सूचना दिल्या आहेत.
1. संघटनेच्या हिताची जपणूक करून पक्षाच्या सर्व संघटनात्मक कार्यक्रमांना उपस्थित राहणे.
2. आपल्या कृतीमुळे पक्षाच्या प्रतिष्ठेला कोणताही धक्का लागणार नाही, याची दक्षता घेणे.
3. मतदारसंघातील निर्णय घेताना संबंधित जिल्हा शाखा, शहर शाखा आणि स्थानिक शाखा कार्यालयांशी संपर्क व समन्वय साधणे.
4. जिल्हाप्रमुख आणि शहरप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणे.
5. कोणताही संघटनात्मक कार्यक्रम अथवा उपक्रम राबविण्यापूर्वी वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेणे.
जनतेचे प्रश्न सोडविण्यावर विशेष भरकेवळ संघटनात्मक पदाची जबाबदारी न सांभाळता जनतेचे प्रश्न आणि स्थानिक समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन नियुक्तीपत्रातून करण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे ध्येय, धोरण आणि विचार जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.कल्याण लोकसभेतील राजकीय घडामोडींना महत्त्वकल्याण लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक हालचालींच्या पार्श्वभूमीवर प्रवीण गोसावी यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. संपूर्ण कल्याण लोकसभा क्षेत्रात पक्षाची संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांमधील समन्वय आणि नागरिकांच्या प्रश्नांवर पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.आता प्रवीण गोसावी या नव्या जबाबदारीतून पक्ष संघटनेला कितपत बळकटी देतात आणि आगामी काळात कोणते संघटनात्मक उपक्रम राबवतात, याकडे कल्याणमधील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.प्रवीण गोसावी यांच्या पुढील राजकीय आणि संघटनात्मक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
