स्टोरी

सिंधुदुर्ग कुडाळ येथील २३ वर्षीय तरुणीच्या हत्याप्रकरणी संशयित आरोपी ताब्यात..!

Spread the love

कुडाळ: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वर्दे येथे दामिनी किरण पालव (वय २३) या युवतीची शनिवारी सायंकाळी चाकूने वार करून निर्गुण हत्या करण्यात आली आहे. दामिनी ही हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होती. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ५.३० ते ६ वाजण्याच्या दरम्यान ती कडावल येथील बसस्थानकावर उतरून वर्दे येथील आपल्या घरी पायी जात असताना वाटेत तिच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी सहा पथके तैनात केली होती. ओरोस येथील जिजामाता सर्कलसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलिसांच्या या सतर्क भूमिकेमुळे अवघ्या काही तासांत संशयित आरोपी साईल विश्राम धुरी याला अटक करण्यात आली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील त्याच्या घरातून मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आले. या धडक कारवाईमुळे हत्येमागील नेमक्या कारणाचा लवकरच उलगडा होणार आहे. हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला? यामागे काही पूर्ववैमनस्य किंवा जुना वाद होता का? याबाबतकुडाळ पोलीस कसून तपास करत आहेत. या वेगात झालेल्या कारवाईमुळे जिल्हा पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे.


Spread the love

Related posts

नकारात्मक गोष्टी किंवा विचार नष्ट करण्यास लागणारे सत्य व कृती म्हणजेच आध्यात्म होय….! प्रा. रुपेश पाटील

news

दि. १२ एप्रिल २०२३ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा पुर्वनियोजित आगमन कार्यक्रम स्थगित

news

गोळवण येथे विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न ! बॅ. नाथ पै. सेवांगण कट्टा शाखेचे आयोजन

news

Leave a Comment