स्टोरी

लोअर परळ येथील बीडीडी चाळीत राहणाऱ्या ५५७ कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या ५०० चौरस फुटांच्या सुसज्ज घरांच्या चाव्या सुपूर्द.

Spread the love

मुंबई: धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ येथील बीडीडी चाळीत राहणाऱ्या ५५७ कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या ५०० चौरस फुटांच्या सुसज्ज घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला.बीडीडी चाळींचा पुनर्विकास होणार की नाही, अशी चर्चा गेली अनेक वर्षे सुरू होती; मात्र आता १०० टक्के बीडीडी प्रकल्प वेळेत पूर्ण होणार, याची खात्री बाळगा असे नमूद करून आमचा पाय ब्रेकवर नसून एक्सेलटरवर आहे, त्यामुळे हा प्रकल्प नक्की वेळेत पूर्ण होईल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.क्लस्टर विकासातून उद्याने, मोकळ्या जागा, क्लब हाऊस आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होतील. शापूरजी, टाटा, एल अँड टी सारख्या विकासकांनी गुणवत्ता आणि वेळेचे पालन करावे, सुविधांमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना यावेळी दिल्या.याप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती सचिन अहिर, मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार मिलिंद देवरा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार सुनील शिंदे, आमदार मनीषा कायंदे, #शिवसेना राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, म्हाडाचे मिलिंद शंभरकर, मिलिंद बोरीकर तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, इतर मान्यवर आणि लाभार्थी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

तडीपार व्यक्तीला सहज तिकीट दिल जात हे दुर्दैवच..! रवी जाधव

news

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मुख्य संघटक यश सरदेसाई यांचा सिंधुदुर्ग दौऱ्यास सावंतवाडीतुन सुरुवात.

news

वडाचापाट शाळा येथे शैक्षणिक साहित्य वाटप!

news

Leave a Comment