स्टोरी

सावंतवाडी नगरपालिकेच्या मासिक सभेत विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा.

Spread the love

​सावंतवाडी (संतोष परब): सावंतवाडी नगरपालिकेच्या मासिक सभेत विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादंग झाला.​ नळपाणी योजनेतील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर निर्दोष असल्याने त्यांचा राजीनामा मंजूर करू नये, अशी मागणी सत्ताधारी व काँग्रेस नगरसेवक तौकीर शेख यांनी केली. या प्रकरणी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांची चौकशी करण्याची मागणी झाली. नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी चौकशीत आरोप सिद्ध झाल्यासच राजीनाम्याचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.​व्यापारी संकुलातील थकबाकीदार गाळे सील करण्याचे आदेश: इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील थकबाकीदार गाळे नगराध्यक्षांच्या आदेशानंतरही सील का केले नाहीत, असा सवाल करत नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. नगराध्यक्षांनी संबंधित गाळे तातडीने सील करण्याचे आणि सर्व थकीत भाडे व प्रीमियम वसूल करण्याचे कडक आदेश दिले.​ठेकेदारावर कारवाई व थर्ड पार्टी ऑडिट: बेजबाबदार ठेकेदार अमित कामत यांच्या कामाचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करावे आणि त्यांना पुढे कोणतीही कामे देऊ नयेत, असे आदेश नगराध्यक्षांनी दिले.​इतर महत्त्वाचे निर्णय: रस्त्यावरील मच्छीविक्रेत्यांवर कारवाई करून त्यांना मुख्य मार्केटमध्ये हलवणे, व्यापारी संकुलातील दुसरे शौचालय सुरू करणे, ‘आयुष’ बाह्यरुग्ण सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन आणि सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाद्य घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सभेत देण्यात आला.


Spread the love

Related posts

कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरण अपडेट्स!

news

गुजरातला धडकलेल्या ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाचा देशाच्या हवामानावर परिणाम!

news

शिवजयंती निमित्ताने किल्ले रामगडावर फडकला भगवादुर्गवीर प्रतिष्ठान चा महत्त्वाकांक्षी उपक्रम

news

Leave a Comment