स्टोरी

सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत यावर्षी तरी जनतेच्या मनोरंजनासाठी सावंतवाडी पर्यटन महोत्सव होऊ देत..!-रवी जाधव

Spread the love

सावंतवाडी (रवी जाधव): शालेय शिक्षण मंत्री तथा माजी आमदार दीपक भाई केसकर यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी पर्यटन महोत्सव ची सुरुवात झाली माजी नगराध्यक्ष नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली 14 सावंतवाडी पर्यटन महोत्सव नगरसेवक तसेच नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी यांच्या सहकार्यातून यशस्वीरित्या पार पाडले गेले त्यानंतर कोरोना तसेच सत्ता बदलानंतर सावंतवाडी पर्यटन महोत्सव थांबला होता. आता सावंतवाडी नगरपरिषदेवर आता भाजपची सत्ता आहे तर भाजप आणि शिंदे गट यांची युती आहे. भाजपच्या नगराध्यक्ष श्रद्धा भोसले उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर व निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांनी जनतेच्या मनोरंजनासाठी 2026 डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पर्यटन महोत्सव घेण्याचे नियोजन करावे अशी मागणी सामाजिक बांधणी प्रतिष्ठानचे समाजसेवक रवी जाधव यांनी केली आहे. 2023 मध्ये सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, दीपक भाई केसरकर मित्र मंडळ, रोटरी क्लब व इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने सहा दिवसाचा मिनी महोत्सव घेण्यात आला होता या मिनी महोत्सवाला जनतेने उस्फूर्त प्रतिसाद दिला होता त्यानंतर 2024 मध्ये मिनी महोत्सव झाला मात्र त्यानंतर महोत्सव झाला नाहीचं परंतु यावर्षी मिनी महोत्सवा बरोबरच सावंतवाडी पर्यटन महोत्सव होण्यासाठी माजी शालेय मंत्री तथा आमदार दीपक भाई केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा भोसले उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर तसेच निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांनी पर्यटन महोत्सव होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत जेणेकरून येथील स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळेल तसेच येथील व्यापाऱ्यांना उद्योगधंद्यासाठी संधी मिळेल. तरी याचा विचार व प्रयत्न सदर लोकप्रतिनिधी आवश्य करावा अशी विनंती रवी जाधव यांनी केली आहे.


Spread the love

Related posts

जत्रा संपली अडथळे कायम!

news

सार्वजनिक उत्सवांना येणारे बीभत्स स्वरूप वेळीच थांबवले पाहिजे ! – राज ठाकरे

news

महाराष्ट्र गुप्तवार्ता पोलीस खात्यातील ९१ पदांवर होणार कंत्राटी भरती…!

news

Leave a Comment