स्टोरी

पुणे मेट्रोच्या माण – हिंजवडी ते शिवाजी नगर मार्गिका ३ चे लोकार्पण.

Spread the love

पुणे: पुणे मेट्रोच्या माण – हिंजवडी ते शिवाजी नगर मार्गिका ३ चे लोकार्पण देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते पार पडल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह बालेवाडी ते हिंजवडी फेज ३ दरम्यान मेट्रोने प्रवास केला. पुणे मेट्रो मार्गावरील हा टप्पा कार्यान्वित झाल्यामुळे वाहतूक कोंडीने ग्रस्त झालेल्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच या मेट्रो संचलनात ५० टक्के महिलांचा सहभाग असणार आहे. सावत्रीबाईंच्या पुण्यात महिलांच्या हातात मेट्रोची धुरा जाणे ही अभिमानास्पद बाब या निमित्ताने प्रत्यक्षात येणार आहे.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मंत्री माधुरी मिसाळ, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवींद्र लांडगे, पुणे महानगरपालिकेच्या महापौर मनीषा नागपुरे, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह आमदार, लोकप्रतिनिधी महा मेट्रोचे श्रावण हर्डीकर, महानगर आयुक्त अभिजीत चौधरी, मंजू लक्ष्मी टाटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

मसूरे डांगमोडे येथे अमली पदार्थ मुक्त सिंधुदुर्ग अभियान जनजागृती फेरी!

news

चला दिव्यांग विद्यार्थ्यांना आनंद देऊया! दिव्यांग विद्यार्थ्यांची “मनोरंजन सहल”

news

अखर्चित निधी तातडीने खर्च करून विकासकामे पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या सूचना.

Leave a Comment