स्टोरी

सैनिक मुलांचे वसतिगृ‌ह, सावंतवाडी येथे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा..!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सैनिक मुलांचे वसतिगृ‌ह, सावंतवाडी येथे आज ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. सकाळी ७:३० वाजता सावंतवाडी तालुका तहसीलदार श्री. श्रीधर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विध्यार्थ्यांनी “भारत माता कि जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान” या घोषणादिल्या. त्यानंतर राष्ट्रगीत, देशभक्ती गीत गायन झालं. वसतिगृ‌हातील विध्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम साजरे केले. त्यानंतर विध्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन करण्यात आले व विध्यार्थ्यांना अल्पआहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावंतवाडी तहसीलदार मा. श्रीधर पाटिल तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग सहाय्यक जिल्हा सैनिक अधिकारी श्री. लक्ष्मण कोळी, कल्याण संघटक श्री अण्णासाहेब माने, वसतिगृह अधिक्षक ऑ. कॅप्टन विनोद सावंत, सहायक अधिक्षक धनंजय राऊळ, श्री. बापू गावडे, विरपत्नी तिलोत्तमा दीपक सावंत, विरपत्नी श्रीमती डीसोजा, माजी सैनिक, वसतिगृह कर्मचारी व विध्यार्थी उपस्थीत होते.


Spread the love

Related posts

छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केल्याच्या प्रकरणी वास्को येथील एका ख्रिस्त्याला अटक!

news

भालावल गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य… ! खासदार विनायक राऊत यांचे भालावलवासियांना आश्वासन.

news

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये नवनियुक्त विद्यार्थी परिषदेची स्थापना व पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न.

news

Leave a Comment