स्टोरी

माजी सैनिकाच्या पाल्याला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत

Spread the love

सिंधुदुर्ग, दि. ०२: माजी सैनिकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या कल्याणकारी निधी योजनेतून माजी सैनिकाच्या पाल्याला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. माजी सैनिक संतोष मेघश्याम सावंत, रा. सबनीसवाडा, ता. सावंतवाडी यांचे पाल्य स्वप्नील सावंत हा शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये रशियातील Kemerovo State University, Kemerovo येथे एमबीबीएसच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. त्याच्या परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या कल्याणकारी निधी योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या एक लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या हस्ते माजी सैनिक संतोष सावंत यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे प्रभारी सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लक्ष्मण कोळी तसेच कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. सैनिक कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील शहीदांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, अपंग माजी सैनिक तसेच त्यांचे अनाथ पाल्य व अवलंबित यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून शैक्षणिक मदत, स्वयंरोजगार आणि पुनर्वसनासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दूरध्वनी क्रमांक 02362-228820 वर संपर्क साधावा.


Spread the love

Related posts

मसुरे भरतेश्वर मंदिर येथे ३० मार्च रोजी रामनवमी उत्सव…

news

बाल स्नेही २०२४ – उत्कृष्ट बाल कल्याण समिती” पुरस्काराने सिंधुदुर्ग कोकण विभागाचा विशेष सन्मान.

news

मेट्रोमधून प्रवास करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नागरिकांना सरप्राईज!

news

Leave a Comment