सावंतवाडी प्रतिनिधी: वेर्ले येथील फौजदारवाडी, मर्गजवाडी आणि लिगवतवाडी या तीनही वाड्यांतील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून नदीपात्रात पाणी अडवण्यासाठी गाळ काढून बंधारा बांधला. गावकरील ते राव करील का? हे दाखवून दिले. उन्हाळ्यात पाण्याची पातळी टिकून राहावी, शेती व जनावरांसाठी पाणी उपलब्ध व्हावे आणि भूजल पातळी वाढावी या उद्देशाने ग्रामस्थांनी एकजुटीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. गावचे ग्रामपंचायत सदस्य बाळू गावडे यांच्या संकल्पनेतून गावातील लोकांनी एकत्र येत नदीपात्रात साचलेले पाणी असे अडवून त्यातील गाळ काढून पाणी आडवा पाणी जिरवाचा हा संकल्प केला आहे. ग्रामपंचायत सदस्य बाळू गावडे, ममता राऊळ, चद्रकला गोसावी आधी ग्रामस्थ सहभागी झाले होतेया कार्यात सहभागी झालेल्या सर्व ग्रामस्थांचे, तरुण मंडळांचे आणि श्रमदान करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले आहेत. एकजूट हेच बळ – गावाच्या विकासासाठी एक पाऊल पुढे, असे श्री गावडे यांनी स्पष्ट केले.
