स्टोरी

सावंतवाडीतील आजी-माजी सैनिक कॅन्टीन सेवा अधिक गतिमान करणार..! कर्नल संजीव बाजपेयी

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील आजी-माजी सैनिकांसाठी असलेली कॅन्टीन सेवा अधिक गतिमान केली जाईल. या ठिकाणी अधिकाधिक वस्तू उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील. सुमारे साडेपाच हजारांहून अधिक आजी-माजी सैनिक या कॅन्टीनचा लाभ घेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्यामुळे 109 टी.ए. बटालियनच्या माध्यमातून येथे सुविधा देण्यावर आमचा भर राहील, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील 109 टी.ए. बटालियनचे सेना मेडल कर्नल *संजीव बाजपेयी* यांनी केले.सावंतवाडी कोलगाव येथील सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेला त्यांनी भेट दिली. तसेच सध्या सुरू असलेल्या कॅन्टीन सेवेबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली.यावेळी त्यांचे स्वागत सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन *बाबुराव कविटकर* यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

यावेळी 109 टी.ए. बटालियनचे सुभेदार मेजर स. कुंड उपस्थित होते.याप्रसंगी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक कॅप्टन दिनानाथ सावंत, चंद्रशेखर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, माजी सैनिक किसन सावंत, दीपक राऊळ, शांताराम कोचरेकर, प्रभाकर पवार, विठ्ठल पिंटो, बाळकृष्ण लिंगवत, प्रल्हाद तावडे, लक्ष्मण गावडे, श्याम कलमीस्कर, मयूर गवळी, लक्ष्मीकांत चौकेकर, परेश गावडे, राजन राऊळ, संजय कोरगावकर, सुभेदार आत्माराम परब, नाईक सुभेदार तानाजी जगताप आदी उपस्थित होते.यावेळी कर्नल बाजपेयी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांच्या परंपरेबद्दल माहिती करून घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सैनिक नागरी सहकारी पतसंस्था ही सैनिकांनी उभी केलेली पतसंस्था असून तिची व्याप्ती अधिक वाढवावी, असे सांगत त्यांनी या सेवेबद्दल कौतुक केले.कॅन्टीन सेवेबाबतच्या समस्या व अडचणी जाणून घेत त्यांनी सांगितले की, अधिकाधिक सेवा येथे कशी देता येईल आणि जास्तीत जास्त सामान कसे पुरवता येईल, यासाठी प्रयत्न राहतील. एक दर्जेदार आणि चांगली सेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांना देण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी चंद्रशेखर जोशी, बाबुराव कविटकर, विठ्ठल पिंटो यांनी सविस्तर सूचना मांडल्या, तर सुनील राऊळ यांनी सैनिक पतसंस्थेच्या एकंदरीत कामकाजाची माहिती दिली.


Spread the love

Related posts

कसा झाला सौरभ चा मोहम्मद सलीम? सौरभच्या वडिलांनी दिली माहिती

news

येत्या काही दिवसांत सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्णपणे ड्रग्स आणि मटका जुगार मुक्त होईल..! पालकमंत्री नितेश राणे

प्रसाद परब

मोबाईलमुळे वाचन संस्कृती संपण्याची भीती…! अनंत वैद्य

news

Leave a Comment