मुंबई प्रतिनिधी: सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मुक्ताई सेवादल फाउंडेशनच्या “आई – महाराष्ट्राची माऊली” या राज्यव्यापी सामाजिक जनजागृती अभियानासाठी अंधेरी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. रूपाली रमेश सावंत यांची जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे त्याने आतापर्यंत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे त्यामुळे त्यांची ही निवड महत्त्वाची मानण्यात येत आहे सौ रुपाली सावंत या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावरवाड या गावातील असून त्यांचे माहेर कलंबिस्त येतील आहे त्यांची ही मुंबई येथे निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या कन्येचा असा हा सन्मान करण्यात आला आहे अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. सारिका पन्हाळकर-म्होत्रा यांनी नियुक्तीपत्र दिले आहे. १४ ऑक्टोंबर पासून त्या कार्यभार स्वीकारणार आहेत यांची मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ही नियुक्ती असून त्यांचे कार्यस्थळ मुंबई उपनगर जिल्हा राहणार आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यात संस्थेच्या सामाजिक जनजागृती उपक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी व समन्वय, तसेच District Paalak, तालुका प्रतिनिधी, स्वयंसेवक, शाळा, महाविद्यालये, NSS, NGO व संबंधित संस्थांशी समन्वय साधण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.
