क्राईम

जालना जिल्ह्यात प्रियकराच्या नादात पत्नीने पतीची हत्या केल्याचा आरोप..! पत्नी पूनम वाघ, सोपान जाधव आणि रवि चिंचपुरे यांना ३० सप्टेंबर पोलीस कोठडी

Spread the love

जालना: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वाकडी शिवारात येथील रहिवाशी २६ वर्षीय शुभम वाघ यांच्या मृत्यूचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शुभम वाघ यांचे वडील येडुबा राजाराम वाघ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुभम यांच्या पत्नीचे गावातील रवी चिंचपुरे याच्यासोबत कथित प्रेमसंबंध होते आणि या संबंधात शुभम अडथळा ठरत असल्याने त्यांची हत्या करण्यात आली. या आरोपांच्या आधारे भोकरदन पोलीस ठाण्यात पत्नी पूनम उर्फ छकुली वाघ, सोपान जाधव आणि रवी चिंचपुरे यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून, सध्या त्यांची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे. शुभम वाघ यांचा विवाह नोव्हेंबर २०२४ मध्ये पुनम उर्फ छकुली हिच्यासोबत झाला होता. लग्नाच्या काही महिन्यांनंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्याच काळात शुभम यांच्या कुटुंबीयांना पुनमचे गावातील रवी चिंचपुरे याच्यासोबत कथित प्रेमसंबंध असल्याची आणि दोघांमध्ये फोनवरून संपर्क असल्याची माहिती मिळाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शुभम यांनी यासंदर्भात कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला होता. तक्रारीनुसार, हा दावा मागे घ्यावा, अन्यथा गंभीर परिणाम होतील, अशी कथित धमकी रवी चिंचपुरे याने ४ जुलै २०२६ रोजी शुभम यांना दिली होती. त्यानंतर ७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून ५५ मिनिटांनी शुभम नेहमीप्रमाणे भोकरदन रोडवरील आपल्या शेतात झोपण्यासाठी पायी जात होते. त्यावेळी वाकडी-भोकरदन रोडवर कैलास चिंचपुरे यांच्या शेताजवळ सोपान जाधव याने मोटारसायकलने शुभम यांना जोरदार धडक दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी शुभम गंभीर जखमी अवस्थेत आणि बेशुद्ध असल्याचे आढळले. त्यांना तातडीने भोकरदन येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुरुवातीला ही घटना रस्ते अपघात असल्याचे मानले गेले. मात्र, शुभम यांचे वडील येडुबा वाघ यांनी मुलाचा मृत्यू केवळ अपघात नसून हत्या असल्याचा आरोप केला.

या प्रकरणात भोकरदन पोलिसांनी मृतकाची पत्नी पूनम वाघ, सोपान जाधव आणि रवि चिंचपुरे यांना अटक केली आहे. तिघांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलीस या प्रकरणातील कथित हत्येचा कट, प्रत्येक आरोपीची भूमिका आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा तपास करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनावणे करत आहेत. पोलिसांच्या तपासातून समोर येणाऱ्या तथ्यांनंतर या कथित हत्येची नेमकी पार्श्वभूमी आणि प्रत्येक आरोपीची भूमिका स्पष्ट होणार आहे.


Spread the love

Related posts

बिहारमध्ये धर्मांध मुसलमानांनी घडवलेल्या दंगलीत हिंदूंची कोट्यवधी रुपयांची हानी ! दुकाने जाळून खाक

news

लहान मुलांना खोकल्यासाठी देण्यात येणाऱ्या सिरपचा नशेसाठी वापर! एन. डी. पी. एस. पथकाची कारवाई

news

प्रदीप कुरुलकर यांनी २ महिलांचे लैंगिक शोषण केल्‍याचे ए.टी.एस्.च्‍या अन्‍वेषणात उघडकीस!

news

Leave a Comment