नवी मुंबई (जितिन शेट्टी): बेलापूर–उरण रेल्वे ट्रॅकवर कोसळली. कार चालवत असलेला इयत्ता 12वीतील 17 वर्षीय विद्यार्थी या भीषण अपघातातून थोडक्यात बचावला.या अपघातात विद्यार्थ्याला किरकोळ दुखापत झाली असून, तो सध्या धक्क्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. कार थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळल्याने सुमारे अडीच तास रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कार रेल्वे ट्रॅकवरून हटविण्याची कारवाई करण्यात आल्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात आली. हा अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत घडला, याचा तपास सुरू आहे.
