स्टोरी

मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी सावंतवाडी संस्थानकडून ७० गुंठे जागा विनामोबदला सुपूर्द..! श्री लखमराजे भोंसले.

Spread the love

सावंतवाडी: गेल्या अनेक वर्षांपासूनचे स्वप्न असलेले प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आता प्रत्यक्षात येणार असून या रुग्णालयाच्या जागेचा प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर न्यायालयीन प्रक्रियेतून यशस्वीरीत्या मार्गी लागला आहे. जनहिताचा व्यापक दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून सावंतवाडी राजघराण्याचे सर्वेसर्वा खेम सावंत शिवराम सावंत भोंसले यांनी शहरातील अतिशय मोक्याच्या ठिकाणची कोट्यवधी रुपयांची ७० गुंठे जागा महाराष्ट्र शासनाला पूर्णपणे विनामोबदला हस्तांतरित केली असल्याची माहिती संस्थांचे युवराज लखमराजे खेम सावंत भोंसले यांनी दिली. राजघराण्याच्या या दानशूर निर्णयामुळे रुग्णालयाच्या उभारणीतील मुख्य अडसर दूर झाला असून प्रत्यक्ष कामाचा मार्ग सुकर झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.​सदर मालकी हक्काच्या जागेबाबत कोल्हापूर उच्च न्यायालय खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान सावंतवाडी संस्थानच्या कुटुंबीयांनी वेळेत आवश्यक ती सर्व प्रतिज्ञापत्रे सादर करून न्यायालयाला पूर्ण सहकार्य केले. एवढेच नव्हे तर, या रुग्णालयाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी श्री. खेम सावंत भोंसले आणि युवराज श्री. लखमराजे खेम सावंत भोंसले यांनी वरिष्ठ शासकीय पातळीवर स्वखर्चाने सातत्याने पाठपुरावा केला आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.​सार्वजनिक कल्याण आणि सामाजिक बांधिलकी जपण्याची सावंतवाडी संस्थानची मोठी परंपरा राहिली आहे. यापूर्वीही संस्थानने सावंतवाडी गार्डन, शिल्पग्राम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, राणी जानकीबाई सुतिकागृह आणि नरेंद्र डोंगरावरील पाण्याची टाकी यांसारख्या अनेक महत्त्वाच्या सार्वजनिक प्रकल्पांसाठी आपली जमीन विनामोबदला दिली आहे. भूतपूर्व अधिपती श्रीमंत शिवरामराजे खेम सावंत भोंसले यांनी सुरू केलेली ही सामाजिक उपक्रमांची परंपरा सध्याच्या पिढीतील श्री. खेम सावंत भोंसले, सौ. शुभदादेवी खेम सावंत भोंसले, युवराज श्री. लखमराजे खेम सावंत भोंसले आणि नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे लखम सावंत भोंसले अत्यंत निष्ठेने पुढे चालवत आहेत. ​या संपूर्ण प्रकरणात सकारात्मक आणि सहकार्याची भूमिका बजावल्याबद्दल सावंतवाडी राजघराण्याच्या वतीने कोल्हापूर उच्च न्यायालय खंडपीठ, सर्व संबंधित पक्षकार, वकील आणि शासकीय अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.


Spread the love

Related posts

पश्चिम महाराष्ट्र महिला पतंजली योग समितीने आयोजित केलेली ३ दिवसीय राज्यस्तरीय योग कार्यशाळा सोलापूर( वडाळा) येथे थाटामाटात संपन्न.

news

न्यू लाईफ मेडिकल अँड एज्युकेशन ट्रस्ट मार्फत जिव्हाळा सेवाश्रमला इन्वर्टर व जीवनावश्यक वस्तूची भेट.

news

विज्ञान नाट्योत्सवात मुणगे हायस्कुलची ” सागरा ‘चा’ प्राण तळमळला ” नाटिका द्वितीय!

प्रसाद परब

Leave a Comment