स्टोरी

विज्ञान नाट्योत्सवात मुणगे हायस्कुलची ” सागरा ‘चा’ प्राण तळमळला ” नाटिका द्वितीय!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: केळकर हायस्कूल वाडा, तालुका देवगड येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेमध्ये श्री भगवती हायस्कुल मुणगेच्या “सागरा ‘चा’ प्राण तळमळला ” या नाटीकेने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. संघाला स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या संघामध्ये अनन्या गावकर, जय सावंत, आराध्या कदम, वेदांत तवटे, भूमी आईर, मनवा वळंजू, स्मित पाडावे, आयुष कांदळगावकर या विद्यार्थ्यांनी प्रमुख भूमिका साकारली तर श्रावणी घाडी, श्लोक गुरव, वेदांती पुजारे, चैतन्य रूपे यांनी रंगमचं व्यवस्थेसाठी सहाय्य केले या नाटिकेचे लेखन आणि दिग्दर्शन संजीव राऊत तर निर्मिती मुख्याध्यापिका मोनिका कुंज तसेच नेपथ्य आणि वेशभूषा सहा. शिक्षिका गौरी तवटे तर निर्मिती सहाय्य व पार्श्वसंगीत सहा. शिक्षक प्रसाद बागवे यांनी केले होते. या विजयी संघाचे शिक्षक कर्मचारी वृंद तसेच संस्थेचे पदाधिकारी यानी अभिनंदन केले आहे.


Spread the love

Related posts

वृद्ध बापाने सरकारला दान केली दीड कोटीची संपत्ती; मुजफ्फरनगरच्या बिरल गावातील घटना.

news

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ !

news

पंतप्रधान मोदी यांचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांना (आय.ए.एस्.) आवाहन!

news

Leave a Comment