स्टोरी

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक संपन्न.

Spread the love

सिंधुदुर्ग: जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात समितीचे अध्यक्ष तथा सन्मा.खासदार श्री.नारायणराव राणे साहेबांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा तसेच केंद्र पुरस्कृत विविध योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विकासकामांना अधिक गती देऊन केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावा, तसेच संबंधित विभागांनी कामांच्या अंमलबजावणीत समन्वय राखून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना यावेळी सन्मा.खासदार श्री.नारायणराव राणे यांनी दिल्या.बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार दिपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.विजय दहिकर, उपवन संरक्षक मिशिल शर्मा, सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक उदय पाटील, जिल्ह्यातील पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.Narayan Rane


Spread the love

Related posts

माडखोल येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्याच्या कामात भ्रष्टाचार?

news

तेरवण येथे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर..! गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे डॉक्टर राहणार उपस्थित.

news

आमदार वैभव नाईक व शिवसेनेच्या वतीने कुडाळ तालुक्यातील विविध शाळांमध्ये मोफत वह्या वाटप

news

Leave a Comment