स्टोरी

आमदार वैभव नाईक व शिवसेनेच्या वतीने कुडाळ तालुक्यातील विविध शाळांमध्ये मोफत वह्या वाटप

Spread the love

सिंधुदुर्ग: कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक आणि कुडाळ तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने कुडाळ तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. यात बॅ.नाथ पै हायस्कूल, डिगस, आवळेगाव व पांग्रड हायस्कूल मध्ये हा वह्या वाटप कार्यक्रम घेण्यात आला. आमदार वैभव नाईक यांच्या वतीने गेली १५ वर्षे वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे.

 

यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, शहर प्रमुख संतोष शिरसाट, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका सौ.श्रुती वर्दम, सौ.श्रेया गवंडे, सौ.ज्योती जळवी, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, सुशील चिंदरकर, गुरू गडकर, गोट्या चव्हाण, अमित राणे आदींसह मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

बॅ.नाथ पै हायस्कूल कुडाळ येथे मुख्याध्यापक प्रेमचंद राठोड सर, शिक्षक धोंडी गावडे सर, गोविंद मठकर सर, आशिष राठोड सर आदींसह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. पांग्रड हायस्कूल येथे विभागप्रमुख प्रमुख नरेंद्र राणे, बाबू मर्गज, दर्शन तेरसे, निरूखे उपशाखाप्रमुख विश्वास तेरसे, शिक्षक प्रवीण जाधव, शामराव बहीरम, अनुराधा राणे, आवळेगाव हायस्कूल येथे आवळेगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष के. एम. सावंत, उपसरपंच विवेक कुपेरकर, अमोल सावंत, उदय सावंत प्रशांत परब, पांडुरंग कासार, नितीन सावंत प्रशांत सावंत, दिनेश परब, मुख्याध्यापक श्री.काळे सर, शिक्षक श्री.सावंत सर, कुंभार मॅडम, डिगस हायस्कूल येथे मुख्याध्यापिका सौ. अनुजा सावंत, शिक्षक संजय वेतुरेकर, श्री.कांबळे सर, मोरजकर मॅडम, प्रभाळे सर, गावडे मॅडम आदींसह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयात निवडणूक प्रक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन

news

मुंबई येथील प्रसिद्ध मूर्तिकार अशोक परब यांचे निधन.

news

फिलिस्तीन आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धात महाराष्ट्राच्या धाडसी कन्येला वीरमरण ! इस्रायल बॉर्डरवर होती तैनात

news

Leave a Comment