क्राईमस्टोरी

मिरा रोडमध्ये धाडसत्र: सी क्वीन पॅलेस ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची मोठी कारवाई, १२ मुलींना ताब्यात घेतले

Spread the love

मीरा रोड मुंबई | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : मीरा रोड येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दाराज ढाब्याजवळ असलेल्या सी क्वीन पॅलेस ऑर्केस्ट्रा बारमध्ये काशिगाव पोलिस ठाण्याच्या पथकाने धाड घातली. या कारवाईत १२ मुलींना ताब्यात घेण्यात आले असून, बारमधील १ स्मार्ट (मॅनेजर) आणि ८ वेटर्ससह एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे. बारचा ड्रायव्हर आणि मॅनेजर मात्र पळून गेले आहेत.उपायुक्त राहुल चव्हाण (आयपीएस) यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत पोलिसांनी ५० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. याशिवाय बारमध्ये उपलब्ध असलेली मद्य (व्हिस्की आणि बीअर) देखील जप्त करण्यात आली.

कारवाईची पार्श्वभूमी :
मिरा रोड परिसरात काही ऑर्केस्ट्रा बार आणि रेस्टॉरंट्समध्ये अवैध धंदे चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार काशिगाव पोलिसांनी रात्री उशिरा बारवर छापा टाकला. या ठिकाणी नृत्य आणि अन्य अनैतिक कृत्ये घडत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या १२ मुलींना समुपदेशनासाठी महिला आश्रय केंद्रात पाठवण्यात आले असून, त्यांचे वैद्यकीय तपासणीही करण्यात येत आहे. फरार मॅनेजर आणि ड्रायव्हरचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.या कारवाईमुळे मीरा रोड परिसरातील अवैध बार आणि ऑर्केस्ट्रा चालवणाऱ्या ठिकाणांवर पोलिसांची नजर कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. स्थानिक रहिवाशांनी या कारवाईचे स्वागत केले असून, परिसर स्वच्छ आणि सुरक्षित व्हावा, अशी मागणी केली आहे.


Spread the love

Related posts

दिव्यांग बांधवांना तहसीलदार कार्यालयाकडून सर्व ती मदत दिली जाईल…! तहसीलदार श्रीधर पाटील

प्रसाद परब

कोकणात चित्रीकरण झालेल्या संभ्रम या वेब सीरिज चा नुकताच फर्स्ट लूक टिझर प्रदर्शित!

news

दोषी बलवंत सिंग राजोआना याची मृत्यूदंडाची शिक्षा पालटण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

news

Leave a Comment