क्राईम

बांदा पोलिसांची अवैद्य दारू वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाईची मोहीम सुरूच…! तब्बल १ कोटी ३६ लाख ७१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त.

Spread the love

बांदा, ता. १३: गोवा राज्यातून सिंधुदुर्गात अवैधरित्या गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्यांविरोधात बांदा पोलिसांनी सध्या कडक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या काही तासात दारू वाहतूक करणाऱ्या अनेकांवर कारवाई केली आहे. गुरुवार दि. १२ जून रोजी गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणीबांदा पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत दोघांना ताब्यात घेतले होते. यात एक सावंतवाडीचा तर दुसरा कणकवली येथील रहिवाशी आहे. पहिली कारवाई काल गुरुवारी रात्री साडे नऊच्या सुमारास करण्यात आली. बांदा पोलीस चेकनाक्यावर संशयास्पद वाटलेली एक दुचाकी पोलिसांनी थांबवली. या दुचाकीवरून ओसरगाव (ता. कणकवली) येथील नागेश आनंद चव्हाण (वय ४६) हा बेकायदेशीरपणे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करताना रंगेहात पकडला गेला. पोलिसांनी १५ हजार रुपयांची दुचाकी आणि ३४ हजार ७२० रुपयांची दारू असा एकूण ४९ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुसरी कारवाई शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास झाली. बांदा चेकनाक्यावर पोलिसांनी एका टोयोटा ग्लान्झा कारला रोखून तिची तपासणी केली. यावेळी कारचालक सुधीर राठोड (वय २८) रा. सालईवाडा, सावंतवाडी हा कारमधून तब्बल १ लाख ५९ हजार ६०० रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी कारसह एकूण ४ लाख ५९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

त्यानंतर आज API पंकज शिंदे व PSI झांजुर्णे याच्या मार्गदर्शनाखाली बांदा पोलीस कॉन्स्टेबल सुशांत हिर्लेकर व राजेंद्र बर्गे यांनी मोठी कारवाई केली आहे. त केली आहे. एक अशोक लेलंड ट्रक (MH- 27- BX- 9099) आणि गोवा बना वटीची दारू असा तब्बल १ कोटी ३६ लाख ७१६ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. वाहतूक करणाऱ्या आरोपीचे नाव भरत जाधव (रा. बीड ) असे आहे. पुढील तपास बांदा पोलीस करत आहेत.


Spread the love

Related posts

बिनापरवाना वाळू वाहातुक करणाऱ्या चार डंपरवर दोडामार्ग पोलिसांची कारवाई

news

छगन भुजबळ यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणार पोलिसांच्या ताब्यात!

news

रोहा येथील शाळेत गुप्‍तधनासाठी अघोरी विधी करणार्‍या ७ जणांना अटक !

news

Leave a Comment