स्टोरी

हडी येथे १२ मे रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: कणकवली येथील विवेकानंद नेत्रालय आणि ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, हडी (फेसकॉम संलग्न) यांच्या संयुक्त विद्यमाने हडी शाळा नं. २ (जठारवाडी) येथे १२ मे रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत भव्य ‘मोफत नेत्र तपासणी’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्र उपचार मिळावेत या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.​या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांची मोफत तपासणी केली जाणार आहे.चष्म्याचा नंबर तपासणे.मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत सुविधा.मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी नेत्रपटल (Retina) विकार निदान व लेझर उपचार. काचबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया. तिरळेपणा, पापणीचे आजार आणि अपघातामुळे झालेल्या डोळ्यांच्या जखमांवरील शस्त्रक्रिया आदी बाबत तपासणी करण्यात येणार आहे. ​हडी आणि परिसरातील गरजू नागरिकांनी या मोफत संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे करण्यात आले आहे. तपासणीसाठी येताना रुग्णांनी आपली जुनी कागदपत्रे आणि ओळखपत्र सोबत ठेवावे.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे कार्यकर्ता व कर्मचारी यांच्यासाठी एकदिवशीय मार्गदर्शन शाळेचे आयोजन… “

news

मसूरे येथे आज सिंधुदुर्ग आरोग्य मेळावा

उद्या कल्याण पूर्वेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त ‘भिमसांज’ या नाटकाचा एकपात्री नाट्य प्रयोग!

news

Leave a Comment