स्टोरी

मसूरे येथे आज सिंधुदुर्ग आरोग्य मेळावा

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र मसूरे येथे 25 मार्च रोजी सकाळी 9 ते 2 या वेळेत सिंधु आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी स्त्री-रोग तज्ञ,अस्थिरोग तज्ञ,जनरल फिजिशियन,शल्य चिकित्सक,नेत्ररोग तज्ञ,हृदयरोग तज्ञ,बालरोग तज्ञ यांच्या मार्फत मोफत तपासणी होणार आहे. सर्व साधारण आरोग्य तपासणी (ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, इ.), रक्त चाचण्या (हिमोग्लोबिन, लिव्हर व किडनी फंक्शन इ.), असंसर्गजन्य आजार (मधुमेह, उच्चरक्तदाब, मुख-स्तन-गर्भाशय मुख, कर्करोग, प्राथमिक तपासण्या, इ.), आदी तपासणी होणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक जि प अध्यक्ष श्री. प्रमोदजी कामत, उपाध्यक्ष जि. प. सिंधुदुर्गश्री. तुकाराम साईल , मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. रविंद्र खेबुडकर, सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण , गटविकास अधिकारी श्री.श्याम चव्हाण, ,डॉ.सुधीर धनगे, , डॉ. सई धुरी, जीप सदस्य श्रीम. क्षमा हडकर, प स सदस्य श्री. संजय ठाकूर, उपसभापती श्री. घनश्याम झाड, प स सदस्य श्रीम. योजना कांबळी उपस्थित राहणार आहेत. मसूरे येथील डॉ प्रियांका पाटील, डॉ सायली मिठारी यांच्या मार्गदर्शना खाली सदर सिंधु मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

महिलांच्या विशेष बाईक रॅलीचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

news

अक्कलकोट येथे नविन वर्षी स्वामी दर्शनासाठी भाविकांची गर्दी…!

news

अस्थिरोग तज्ञ डॉ. भास्कर के प्राणी व डॉ. सारिका प्राणी यांनी सावंतवाडी येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांची केली पाहणी.

news

Leave a Comment