स्टोरी

हिंदळे वाचनालय येथे ग्रंथ प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त हिंदळे ग्रामीण वाचनालय हिंदळे मार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर, घटनेवर, विचारांवर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन हिंदळे वाचनालय येथे आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनात मांडलेल्या विविध पुस्तकांचे वाचन करत विध्यार्थांनी आपले अभिप्राय मांडले. विध्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरणा मिळावी, वाचनाची आवड निर्माण व्हावी, डॉ बाबासाहेब आंबेडकर याचे विचार आत्मसात व्हावेत, शिका आणि संघटित व्हा हा संदेश जावा यासाठी ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. मान्यवरानी मार्गदर्शन केले. यावेळी हिंदळे भंडारवाडा शाळा विध्यार्थी, शिक्षक तसेच इतर विध्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी सरपंच मकरंद शिंदे, किरण हळदणकर, मंगेश हिर्लेकर, संतोष आचरेकर, दयानंद तेली. परेश खोत, सुधीर पारकर, अब्दुलगफूर आगा, सुनिल पारकर, मनोज जाधव, अनिरुद्ध अभ्यंकर, योगेश पाटील, मंगेश मयेकर, मनोहर मोदी, वाचनालय लिपिक प्रकाश बोरकर, ग्रंथापाल सौ मिताली हिर्लेकर, हिंदळे भंडारवाडा शाळा शिक्षिका सौ शीतल मयेकर आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी वाचनालयाच्या उपक्रमाचे कौतुक केले.


Spread the love

Related posts

“आयुष्यमान भव” कार्यक्रमाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उरण मध्ये शुभारंभ.

news

सावंतवाडी न्यू खास किल वाडा येथील काड सिद्धेश्वर महाराज मठात शोभाताई यांचे प्रवचन उत्साहात संपन्न.

news

मालवण तहसिलदार आक्रमक तर इतर तालुक्यातील तहसीलदार मात्र गप्प!६ वाळू डंपर पकडले

news

Leave a Comment