स्टोरी

भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष मा.रविंद्रजी चव्हाण यांच्याकडून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याला एक लाख रुपयाची मदत.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शहरातील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान हे आता केवळ एक नाव न राहता एक निस्वार्थी सेवाभावी कार्याची ओळख बनली आहे. ज्याची दखल प्रतिष्ठित व्यक्ती तसेच वरिष्ठ नेत्यांकडून सुद्धा घेतली जात आहे. भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रविंद्रजी चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करून सन्माननीय विनोदजी राऊळ यांच्याजवळ सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी तसेच सेवाभावी कार्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची देणगी संस्थेचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे व उपाध्यक्ष प्रा. शैलेश नाईक यांच्या जवळ दिली आहे. याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनोदजी राऊळ, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे उपाध्यक्ष प्रा. शैलेश नाईक उपस्थित होते. सामाजिक बांधिलकीच्या सर्व सदस्यांन कडून सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब तसेच विनोदजी राऊळ यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.


Spread the love

Related posts

NIA ने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना अटक करुन चौकशी करावी! आाचार्य तुषार भोसले

news

सत्कोंडी येथे सृजनोत्सव काव्य संमेलन २०२६ उत्साहात संपन्न..!

प्रसाद परब

मुंबईतील आझाद मैदान दंगलीला ११ वर्षे होऊनही अजूनही खटल्याची सुनावणी नाही !

news

Leave a Comment