स्टोरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकिलांना एकत्र घेऊन आपण काम करणार! अँड. परिमल नाईक

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन चे नवनिर्वाचित अध्यक्ष अँड. परिमल नाईक, सचिव ॲड. यतीश खानोलकर, खजिनदार ॲड. गोविंद उर्फ अण्णा बांदेकर, उपाध्यक्ष ॲड. विवेक मांडकुळकर, उपाध्यक्ष महिला ॲड. नीलिमा सावंत गावडे, सहसचिव ॲड. अक्षय चिंदरकर यांनी आज दि.१७ मार्च रोजी जिल्हा न्यायालय येथील वकील कक्षामध्ये आपला पदभार स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हाध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे, ॲड. शामराव सावंत आधी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकिलांना एकत्र घेऊन आपण काम करणार आहे. पूर्वीच्या कमिटीने उत्कृष्ट काम केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे काम केले जाईल.

सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन चे नवनिर्वाचित अध्यक्ष अँड. परिमल नाईक
उपाध्यक्ष ॲड. नीलिमा सावंत गावडे

जिल्हा न्यायालय ओरस येथे एडवोकेट भवन उभारण्याचा मानस आहे. तसेच कुडाळ, सावंतवाडी, मालवण, देवगड या न्यायालयाच्या सुसज्ज इमारती कशा उभारल्या जातील यासाठी आपले प्रयत्न राहतील. एडवोकेट भवनसाठी भूखंड घेऊन लवकरच एडवोकेट भवन बांधण्यात येणार आहे. तसेच वकिलांसाठी वेल्फेअर अभियान राबविण्यात येईल. मावळते जिल्हाध्यक्ष एडवोकेट रावराणे म्हणाले की, तीन वर्षात आमच्या माध्यमातून अनेक कामे झाली. जिल्ह्यातील ज्युनिअर व सीनियर वकिलांच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केले. त्यात सर्वांनी साथ दिली. नव्या कार्यकरणीला आपण निश्चितच सर्व सहकार्य करेन.


Spread the love

Related posts

पनवेलमध्ये वाहन उचलण्याच्या अनधिकृत कारवाईचा धुमाकूळ ; नागरिक हैराण

प्रसाद परब

सिंधू मित्र – सेवा सहयोग प्रतिष्ठान सावंतवाडीच्या “प्रतापगडाचा रणसंग्राम” कार्यक्रमाला शिवप्रेमींनी केली मोठी गर्दी.

news

अर्धवट नाले सफाईमुळे मंगलराघोनगर प्रभागातील नाला ओव्हर फ्लो!

news

Leave a Comment