स्टोरी

गुढी पाडव्यानिमित्त “आरंभ सखी ” ग्रुपच्यावतीनेहिंदू नववर्ष स्वागतासाठी भव्य शोभा यात्रेचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील आरंभ सखी ग्रुपच्यावतीने गुढी पाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागतासाठी रविवारी ३० मार्च रोजी भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभा यात्रेचा शुभारंभ संध्याकाळी ५ वाजता राजवाडा येथुन सावंतवाडी संस्थानच्या श्रीमंत शुभदादेवी भोसले आणि युवारानी श्रद्धाराजे भोसले यांच्याहस्ते होणार आहे. त्यानंतर ही शोभायात्रा गांधी चौक, जयप्रकाश चौककडून पुढे जात जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानाकडे या शोभा यात्रेचा समारोप होणार आहे. या शोभायात्रेत महिला ढोल पथक, लाठी काठी पथक, लेझीम पथक यांचा समावेश असून टाळ नृत्य, पोवाडा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.

या शोभा यात्रेत सावंतवाडी परिसरातील सर्व हिंदू बंधू आणि भगिनीनी पारंपारिक पोशाखात उपस्थित रहावे असे आवाहन आरंभ सखी ग्रुपच्या पल्लवी रेगे, देवता हावळ, संजना देसकर, दर्शना रासम, संगीता शेलटकर आणि नेहा मडगावकर यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या’ माध्यमातुन मोफत व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

news

मुंबई-गोवा महामार्गाच्या समस्येविषयी मनसेकडून रत्नागिरीत जनजागृती !

news

मुंबई – गोवा महामार्गावरील पावशी येथे कार व दुचाकीत अपघातात एकाचा मृत्यू! तर एक गंभीर….

news

Leave a Comment