स्टोरी

डॉक्टर मंगला परब यांच्या वतीने गावच्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

Spread the love

मालवण: नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था पालघर जिल्हा संघटक आदरणीय डॉक्टर मंगला परब मॅडम तसेच परब मराठा समाज मुंबई पालघर जिल्ह्याच्या संघटक यांनी गौरी गणपती दिनानिमित्त आपल्या गावच्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना आपल्या राहत्या घरी गणेश उत्सवानिमित्त व कैलासवासी वसुंधरा वसंत परब (आई ) यांच्या पुण्यस्मरण निमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप केलं.

यावेळी आदरणीय दक्षता परब मॅडम, कवल परब, गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच महिला उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षण सर्वात महत्त्वाचा गाभा आहे. यावर आदरणीय डॉक्टर मंगला परब मॅडम यांनी विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन केलं. आपल्या समाजासाठी त्या नेहमीच पुढे असतात. समाजाचा विकास पाहिजे असेल तर शिक्षण सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यांनी हा शिक्षण विषय घेऊन या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलं.


Spread the love

Related posts

सावंतवाडी शहरातील वैश्य भवन येथे शनिवारी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने माजी सैनिकांचा सत्कार सोहळा संपन्न!

news

डिकवल कांजियाळी येथे संरक्षक भिंत बांधणे कामाचा शुभारंभ!

news

अखेर वारळकराना मिळणार खरसई धरणाचे पाणी,प्रशासनाची ग्रामस्थांचे विरूध्द भूमिका नरमली.

news

Leave a Comment