स्टोरी

पंढरपूर माघवारी साठी एससटी च्या बस उपलब्ध करून देणार….!

Spread the love

वारकरी शिष्टमंडळास विभाग नियंत्रक यांची ग्वाही

शासनाच्या सवलती सुद्धा यावर्षी मिळणार वारकऱ्यांना

सिंधुदुर्ग: कणकवली- पंढरपूर माघवारी फेब्रुवारी महिन्यात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन हजारोंच्या संख्येने वारकरी पंढरपूर येथे जातात.बहुतेक वारकरी एसटी बुकिंग करून वारीला जातात. मात्र शासनाने जाहीर केलेल्या सवलती त्यामुळे गाड्या बुकिंग वेळी अनेक अडचणी येतात यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग चे अध्यक्ष मा. ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर यांच्या नेतृत्वाखाली वारकरी शिष्टमंडळाने एसटी विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांची भेट घेतली.त्यावेळी मा.पाटील यांनी सर्व शासनाच्या सवलतीसह व सुस्थितीत असणाऱ्या गाड्या दिल्या जातील अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली व जास्तीत जास्त एसटी बुकींग करून एसटीने प्रवास करावा हे आवर्जून सांगितले.

कार्तिकी वारीला जिल्यामध्ये चांगले नियोजन केल्याबद्दल मा.पाटील यांचे आभार व अभिनंदन संप्रदायाचे वतीने करण्यात आहे यावेळी सचिव मा.श्री.राजू राणे,प्रभाकर राणे,भाऊ गावकर,गजानन राणे,गणपत घाडीगांवकर, गणपत तानीवडे, गावकर शिवडाव व वारकरी उपस्थित होते


Spread the love

Related posts

महाराष्ट्र गुप्तवार्ता पोलीस खात्यातील ९१ पदांवर होणार कंत्राटी भरती…!

news

शिवप्रेमी यशवंतगड रेडी यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ४२ रक्तदात्यांनी घेतला सहभाग .

news

शब्दसखा ग्रुप न्हावेली – निरवडेच्या वतीने वाचनालय “ऋणानुबंध” या कार्यक्रमाचे आयोजन

news

Leave a Comment