स्टोरी

मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कणकवलीत आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मराठा समाज बांधवांच्या वतीने कँडल मार्च….

Spread the love

कणकवली: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेले सात दिवस उपोषण छेडत असलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आज कणकवलीत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आमदार वैभव नाईक,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा समाज बांधवांच्या वतीने मेणबत्त्या पेटवून कँडल मार्च काढण्यात आला.

 

याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत आता पर्यंत ज्यांनी आरक्षणासाठी आहुती दिली त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

 

या कँडल मार्चमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाजाचे नेते एसटी सावंत, जिल्हा बँकेचे संचालक सुशांत नाईक, सोमा गायकवाड, रामदास विखाळे, सचिन सावंत, रिमेश चव्हाण, राजू राणे, योगेश सावंत, उद्योजक सतीश नाईक, संदीप राणे, दामू सावंत, संतोष परब, महेंद्र सांबरेकर, लवु वारंग, अनंत राणे, रुपेश आमडोसकर, अनुप वारंग, अजय सावंत, भाई साटम, औदुंबर राणे, सखाराम सपकाळ, अभिजीत सावंत, तेजस राणे, मंगेश सावंत,प्रमोद कावले आदी मराठा बांधव उपस्थित होते.


Spread the love

Related posts

युद्ध हा काही आता पर्याय नाही!पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ….

news

आडवली समर्थ गड येथे १० एप्रिल पासून स्वामी समर्थ जयंती उत्सव!

news

आदर्श विद्या मंदिर संस्थेतील गैरव्यवहाराविरोधात १६ जुलैपासून ‘दुर्गा शक्ती’चे आमरण उपोषण..!​

प्रसाद परब

Leave a Comment