स्टोरी

कॅथॉलिक अर्बन च्या चेअरमन पदी श्रीम. आनमारी जॉन डिसोजा….

Spread the love

व्हाईस चेअरमन पदी श्री पितर लॉरेन्स दिया यांची बिनविरोध निवड….

 

सावंतवाडी: कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेची सन २०२३-२४ ते सन २०२८-२९ साठी पंचवार्षिक संचालक निवडणूक बिनविरोध करण्यात आली. सदर निवडणूकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था सावंतवाडी श्री अ. रा. क्षीरसागर यांनी पाहिले. नुकतेच त्यांच्य अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत श्रीम. आनमारी जॉन डिसोजा यांची चेहारमेन पदी तर श्री पिटर लॉरेन्स दिया यांची व्हाईस चेअरमन म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच सेकटरी म्हणून श्री. मार्टीन झुजे आल्मेडा यांची निवड करण्यात आली. नुतन संचालकांमध्ये श्री. रुजाय जोसेफ रॉड्रीक्स, श्री आगोस्तीन पास्कू फर्नान्डीस, श्री मार्टीन झुजे आल्मेडा, श्री जॉय पिटर डॉन्टस, श्री जॉनी पास्कोल फेराव,श्री पिटर लॉरेन्स दिया, श्री सेलेस्तीन आंतोन फर्नान्डीस, श्री. जॉकी फर्नान्डीस, श्रीम. आनमारी जॉन डिसोजा व श्रीम. मार्शेलीन स्टिफन डिसोजा यांची बिनविरोध निवड झाली होती. सहकाररत्न संस्थेचे संस्थापक अध्यक्ष खि.पि.एफ. डॉन्टस असतानाच निवडणूक प्रक्रिया चालू होती व त्यांनी जुन्या संचालकांबरोबर काही नवीन संचालकांना संधी दिली आहे. खि.पि.एफ. डॉन्टस आज आमच्यामध्ये नसलेतरी त्यांचे विचार घेऊन भविष्यात सर्व संचालक उत्तम प्रकारे पतसंस्था वाढीसाठी काम करतील, असा विश्वास संस्थेच्या चेअरमन श्री. आनमारी जॉन डिसोजा यांनी व्यक्त केला.


Spread the love

Related posts

शिवकालीन युद्धकलेची आज सावंतवाडीत नेत्रदीपक प्रात्यक्षिके.

news

मराठा महासंघाच्या वतीने सावंतवाडी शहरात तीन दिवस कमर्शियल व्हेईकल एक्स्पोचे आयोजन..! अभिषेक सावंत

news

अडीच लाख रुपयांचा निधी स्वतःच्या खिशातून त्वरित देणारा दत्ता सामंत खरा देवदूत ….

news

Leave a Comment