स्टोरी

तंत्रस्नेही शिक्षक सतिश मुणगेकर अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:

 

सत्यशोधक अण्णा भाऊ साठे साहित्य विचार व संशोधन परिषद महाराष्ट्र या संस्थेमार्फत दिला जाणारा २०२३ या वर्षाचा सत्यशोधक अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मुणगे गावचे सुपुत्र व रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील आदर्श केंद्र शाळा चिखली नं.१ या शाळेतील पदवीधर विषय शिक्षक आणि तंत्रस्नेही शिक्षक श्री.सतिश पांडुरंग मुणगेकर यांना प्रदान करण्यात आला. शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे मोठा दिमाखदार सोहळा पार पडला. सदर कार्यक्रमाला बळवंतराव माने ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते, प्रा,डॉ .गिरीश मोरे अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे अभ्यासक व विचारवंत, प्रा,डॉ.अर्चना जगतकर चेअरमन समाजशास्त्र आभ्यास मंडळ शिवाजी विद्यापिठ कोल्हापूर , श्री.अनिल म्हमाने प्रकाशक कोल्हापूर तसेच संशोधन परिषदेचे अध्यक्ष प्रा.अमोल महापुरे. सचिव प्रा.बबन पाटोळे, कार्याध्यक्ष श्री,विश्वनाथ तराळ, प्रा,निलोफर मुजावर आदि मान्यवर उपस्थित होते. सतिश मुणगेकर हे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य या मंडळाचे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तसेच आविष्कार फाऊंडेशन इंडिया या संस्थेचे गुहागर तालुक्याचे तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.


Spread the love

Related posts

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात केली महापूजा!

news

आजपासून गोव्यात ‘जी २०’ आरोग्य क्षेत्र कार्यगटाची दुसरी बैठक!

news

काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीच्‍या बैठकीचे यजमानपद उद्धव ठाकरे यांच्‍याकडे !

news

Leave a Comment