स्टोरी

बिळवस वरचावाडा येथे रस्ता कामाचे सरपंच मानसी पालव यांच्या हस्ते भूमिपूजन!

Spread the love

मालवण (मसुरे प्रतिनिधी): 

 

बिळवस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बिळवस वरचावाडा येथील श्री भाई माधव यांच्या घरानजीक रस्ता खचल्याने नागरिकांना गैरसोईचे ठरले होते. सदर ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने प्राधान्याने विकास काम मंजूर करून गणेश चतुर्थी पूर्वी रस्ता पूर्ववत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सरपंच सौ मानसी पालव यांच्या हस्ते भूमिपूजन करून सदर कामाचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. यामुळे ग्रामस्थान मधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी ग्रा सदस्य संतोष पालव, प्रकाश फणसे, सौ रंजना पालव, ग्रामसेवक युगल प्रभुगावकर, आबा पालव, प्रशांत पालव, आनंद पालव, पंढरीनाथ पालव, सिद्धेश पालव, भूषण पालव, रोशन पालव, सुहास माधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the love

Related posts

डॉक्टर मंगला परब यांच्या वतीने गावच्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

news

अजिंठा आणि वेरूळ लेणी पहाण्यासाठी जातांना उग्र ‘परफ्यूम’ आणि लाल रंगाचे कपडे टाळा!

news

शिवगर्जना प्रतिष्ठान चौकुळच्या वतीने शुक्रवार दिनांक १० मार्च २०२३ रोजी भव्य सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन

news

Leave a Comment