स्टोरी

भारत देश २०४७ पर्यंत इस्लाम राष्ट्र करण्याचा पी.एफ.आय., सिमी, इंडीयन मुजाहिद्दीन, रझा अकादमी संघटनांचा डाव होता ! नितेश राणे

Spread the love

कणकवली: – संपूर्ण भारत देश २०४७ पर्यंत इस्लाम राष्ट्र करण्याचा डाव पी.एफ.आय., सिमी, इंडीयन मुजाहिद्दीन, रझा अकादमी यांच्या सारख्या संघटनांचा होता. त्याची सुरवात महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी याला खत पाणी घालण्याचे काम केले.या संघटनांना पाठबळ दिले. आणि महाराष्ट्राचे इस्लामीकरण करण्यास सुरुवात केली. त्याचे परिणाम हिंदू समाजाला भोगावे लागले आणि म्हणूनच हिंदू जागा झाला आहे त्याचे प्रतिबिंब हिंदू आक्रोश मोर्चातून दिसत आहे. हिंदू समाजाचे खरे व्हिलन उद्धव ठाकरे व काँग्रेस नेते आहेत. अशी घणाघाति टीका भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी केली.

 

कणकवली येथे पत्रकारांशी संवाद साधताना उठबा ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) सेनेचे संजय राऊत यांच्यावर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली.

 

देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी महाराष्ट्र राज्याच्या खासदारांसमोर काँग्रेसच्या घाणेरड्या राजकारणाचे वस्त्रहरण केले आहे.

 

काँग्रेसने मोठ्या नेत्यांचे खच्चीकरण केले. शरद पवार यांच्या सारख्या नेत्यात प्रंतप्रधान होण्याची क्षमता होती त्यांना ते पद दिले नाही.माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे खच्चीकरण कसे केले हे सत्य मोदी साहेबांनी सांगितले. तेव्हा आज काँग्रेस ची चाटू गिरी करण्याचा ठेका घेतलेल्या संजय राउत याना मिर्ची लागली आणि ते बरळू लागले आहेत. पवार साहेबांनी आपली राष्ट्रवादी फुटली नाही असे निवडणूक आयोगाला सांगितले आहे.अजिदादांनी सुद्धा तसे सांगितले आहे. मग शकुनी मामा संजय राऊत कुठच्या तोंडाने बोलतो की राष्ट्रवादी फोडली म्हणून. काड्या घालून आग लावाचे काम बंद कर असा इशारा दिला.तू इतका निष्ठावंत मग २०१९ ला मुख्यमंत्री पदासाठी पवार साहेबांजवळ उद्धव ठाकरे यांचे नाव न देता कोणाच नाव दिले होते ?. स्वतःच की उद्धव ठाकरेंच ? मुख्यमंत्री पदासाठी स्वतःचे नाव दिले उद्धव ठाकरेंनी लाथ घातल्यानंतर नाव बदलले. हा तुझा स्वार्थीपणा सगळ्या जगाला माहित आहे अशा शब्दात संजय राऊत यांचा समाचार आमदार नितेश राणे यांनी घेतला.


Spread the love

Related posts

ओटवणे गावचा सुपुत्र सर्जनशील युवा कलाकार रोहित सुरेश वरेकर यांने कला क्षेत्रात घेतली मोठी झेप.

news

बांदिवडे बुद्रुक व कोईळ ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक व सरपंचांवर अपहार प्रकरणी गुन्हा दाखल

news

राकेश चंद्रकांत जाधव यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती…!

news

Leave a Comment