क्राईम

‘एनआयए’ द्वारे पुणे शहरातील प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ. अदनानली सरकार अटक!

Spread the love

२८ जुलै वार्ता: ISIS महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात एनआयए ने गुरुवारी कोंढवा परिसरातून एका प्रसिद्ध डॉक्टरला अटक केली आहे. आरोपी प्रसिद्ध भूलतज्ज्ञ असून शहरातील विविध नामांकित हॉस्पिटल्समध्ये आपली सेवा देत असल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पुणे शहरातील कोंढवा परिसरात एनआयए ने छापा टाकून ही कारवाई केली आहे. या कारवाईत डॉ. अदनानली सरकार याला अटक केली आहे. एनआयएने सरकार याच्या कोंढव्यातील घरावर छापा टाकून इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि ISIS शी संबंधित अनेक दस्तावेज जप्त केले आहेत. हा आरोपी तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी भरती करत होता, अशी माहिती एनआयएच्या तपासात समोर आली आहे.

डॉ. अदनानली सरकारने पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेज मधून 2001 साली MBBS तर 2006 साली MD पदवी प्राप्त केलेली आहे. मागील 16 वर्षांपासून शहरातील अनेक नामांकित हॉस्पिटल्स मध्ये त्यांनी भूलतज्ज्ञ म्हणून सेवा दिली आहे.आरोपीने इस्लामिक स्टेट (IS)/इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIL)/ इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया (ISIS) सारख्या वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ISIS च्या दहशदवादी कारवायांमध्ये मदत केल्याचे समोर आले आहे. एनआयएच्या तपासानुसार, आरोपी अदनानली सरकार भारत सरकार विरोधात दहशतवादी कृत्य करण्यासाठी विविध दहशतवादी संघटनांना मदत करत होता.


Spread the love

Related posts

रुग्णांना लुबाडल्याप्रकरणी शासनाच्या जनआरोग्य योजनेतून ६४१ रुग्णालयांना बाहेरचा रस्ता!

news

लग्नाचे आमिष दाखवून इंग्लंडच्या तरुणीने केली रेडी येथील तरुणाची फसवणूक…!

news

ग्राहक बनून आले अन् अडीच लाखांचा नेकलेस केला लंपास..! पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल

news

Leave a Comment