स्टोरी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी आपत्ती प्रशासन अलर्ट!

Spread the love

तहसीलदार दिप्ती देसाई यांनी करूळ भट्टीवाडीतील डोंगर भागाची केली पहाणी! ग्रामस्थांशी साधला संवाद….

वैभववाडी प्रतिनिधी: नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी तहसीलदार दीप्ती देसाई यांनी करूळ भट्टीवाडी येथे जाऊन डोंगर भागाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार यांनी ग्रामस्थांना सूचना केल्या. रायगड जिल्ह्यातील इर्शालवाडी परिसरातील डोंगराचा भाग घरांवर कोसळल्याने मोठी जिवीतहानी झाली आहे. खबरदारी म्हणून वैभववाडी तहसीलदार सौ. देसाई यांनी तालुक्यातील अनेक गावात जाऊन धोकादायक ठिकाणांची पहाणी केली. करूळ भट्टीवाडीतील ग्रामस्थांशी तहसीलदार देसाई यांनी संवाद साधला. डोंगरा पासून वस्ती जवळ आहे. त्यामुळे डोंगराला कुठे भेगा गेल्या असतील, किंवा भूस्खलन होत असेल तर तात्काळ आपत्ती प्रशासनाला त्याची माहिती द्या. असे तहसीलदार देसाई यांनी ग्रामस्थांना सांगितले.

यावेळी नायब तहसीलदार श्री पाटील, सरपंच नरेंद्र कोलते, विवेक कदम, सह्याद्री जीव रक्षक चे हेमंत पाटील, प्रकाश सावंत, राजेंद्र कदम, विजय सावंत, राजेंद्र वारंग, तलाठी सुदर्शन पाटील, कोतवाल रत्नकांत राशीवटे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्ताराम कदम, दौलत जिनगरे, नारायण कदम, अनिल जिनगरे, श्रीधर मोरे, पांडुरंग केगडे, सुरेश जिनगरे, जगन्नाथ चव्हाण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डोंगर भागाची व घरांची तहसीलदार यांनी पाहणी केली.


Spread the love

Related posts

अमिता अमित भांबल यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.

news

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मानाच्या अश्वांचे पहिले गोल रिंगण बेलवडी (तालुका इंदापूर) येथे पार पडले.

news

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचा गौड सारस्वत ब्राह्मण समाजाच्या वतीने सत्कार.

प्रसाद परब

Leave a Comment