स्टोरी

शाखा अभियंता श्री दिपक मुगडे यांचा विरण येथे सन्मान!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): विरण वीजवितरण कंपनीचे शाखा अभियंता श्री दिपक मुगडे यांची बदली झाल्याने विरण कार्यालय येथे सत्कार करत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळीकॉन्ट्रॅक्टर श्री गणेश गोवेकर, रामगड लाईनमन श्री. महादेव नरे, श्री. साटम, नूतन सहा अभियंता श्री. माने उपस्थित होते.विरण सेक्शनचे नाव वरिष्ठ पातळीवर पोहचवण्यासाठी अभियंता मुगडे यांनी अथक परिश्रम घेतले होते.

यंदाचा महाराष्ट्र उर्जा भुषण पुरस्कार सुद्धा जाहीर झाला होता. विज बिल तक्रारी कमी करणे, विज मीटर फॉल्टी असल्यास लगेच बदलुन देणे, शाखा कार्यालय अंतर्गत असलेले संपूर्ण एल.टी.व एच. टी. लाईचे जीर्ण झालेले पोल व विद्युत वाहिन्या बदली करणे, कर्मचाऱ्यांशी मित्रत्वाच्या नात्याने वागणे, वीजग्राहकांना विश्वासात घेऊन ग्राहकांचे बरेच प्रश्न निकाली काढण्यात अभियंता मुगडे यशस्वी झाले असल्याबाबत मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

यावेळी स्वप्नील धामापुरकर, संदीप परब, सचिन परब, बळीराम गावकर, लोकचंद राठोड, अमित बागवे, विनोद परब, प्रफुल्ल परब, प्रदीप परब, महेंद्र घाडी, प्रितेश पाटकर,अमोल तळगावकर, गीतेश नाईक,श्री. शिंदे, तसेच रामगड सेक्शन अधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

कोकण रेल्‍वेच्‍या कोल्‍हापूर-वैभववाडी मार्गाला राष्‍ट्रीय नियोजन गटाचा हिरवा कंदील !

news

सावंतवाडी बस स्टैंडवरील आजारी वृद्धाला सामाजिक बांधिलकी कडून जीवदान.

news

इस्रो’च्या पुढील मोहीम ‘गगनयान’द्वारे अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार !

news

Leave a Comment