राजकारण

शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट यांच्या सर्व आमदारांना विधानसभेच्या अध्यक्षांची नोटीस!

Spread the love

९ जुलै वार्ता: विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे ४० आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे १४ यांना नोटीस पाठवली आहे. या सर्वांना येत्या ७ दिवसांत स्वत:च्या पात्रतेविषयीची भूमिका प्रतिज्ञापत्राद्वारे पुराव्यासह विधीमंडळाकडे सादर करण्याचा आदेश दिला आहे. या दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्याविषयी अध्यक्षांना पत्र देण्यात आले होते, तसेच याविषयी सर्वाेच्च न्यायालयातही दोन्ही पक्षांकडून याचिका करण्यात आली होती.याविषयीचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यावा, असे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले होते. त्यानुसार अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही नोटीस पाठवली आहे.


Spread the love

Related posts

काँग्रेसच्या अपशब्दांचा मी आभूषण म्हणून स्वीकार करतो! पंतप्रधान मोदी

news

फुकाचे श्रेय घेण्याच्या नादात निलेश राणेंकडून शेतकऱ्यांची दिशाभूल….! युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी

news

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात जाणार?….विखे-पाटील यांची ऑफर

news

Leave a Comment