राजकारण

शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरा जावे! प्रागतिक पक्षांच्या संयुक्त बैठकीत प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांचे मुंबई येथे आवाहन.

Spread the love

२० जून वार्ता: २०२४ ची निवडणूक लढवतना तिची दिशा कशी असावी.? त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये तिसरा राजकीय पर्याय जनतेला द्यावा का? या आणि अशा अनेक विषयांवर विचार मंथन करण्यासाठी महाराष्ट्रातील १४ राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक मुंबई येथे संपन्न झाली. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप बोलत होते. बैठकीला आमदार जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी, कॉ.रेगे, नाथाभाऊ शेवाळे, प्रताप भोगडे यासह अनेक प्रमुख पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आज प्रमुख राजकीय पक्षांकडून समाजामध्ये जाती आणि धार्मिक विषयावरून विष पेरण्याचे व तरुणांचे डोके भडकवण्याचे काम सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचे, कष्टकर्यांचे, सर्वसामान्य माणसाचे जगण्या – मरण्याचे मुद्दे बाजूला पडतात व भावनिक मुद्द्यांवर राजकारण चालते. या सगळ्या गोष्टींना दूर सारून शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवन मारण्याचा प्रश्नांवर रान पेटून आपण २०२४ ची निवडणूक लढवावी. असे प्रतिपादन यावेळी संदीप जगताप यांनी केले. यावेळी स्वाभिमानीचे संदीप उफाडे देखील उपस्थित होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटना ही सातत्याने शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्याच बाजूने लढत आलेली आहे. जातीय, धार्मिक विषयाला आम्ही कधी थारा दिला नाही. भावनिक मुद्द्यांपेक्षा शेतकऱ्यांच्या जगण्याच्या मुद्द्यांवर २५ वर्ष राजू शेट्टींनी संघर्ष केला आहे. २०२४ ची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना मुद्द्यांवर लढवणार आणि त्यात आम्ही यशस्वी होणार. याची आम्हाला खात्री आहे. या वाटेने महाराष्ट्रातील जे छोटे मोठे राजकीय पक्ष चालत असतील तर आम्ही हातात हात घालून काम करू. असे आजच्या प्रगतिक पक्षांच्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.


Spread the love

Related posts

आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत वर्दे येथील भाजपचे माजी उपसरपंच अरविंद सावंत यांनी हाती घेतली मशाल

news

आप्पासाहेबयांचं फार मोठं योगदान आहे,मी हे कदापि विसरू शकणार नाही! एकनाथ शिंदे…

news

स्वा.सावरकर यात्रा निघू शकते मग छत्रपती शिवाजी महाराज सन्मान यात्रा का होऊ शकत नाही ?-श्री.योगेश धुरी.

news

Leave a Comment