स्टोरी

घाडीगावकर सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदीरघुवीर वायंगणकर यांची निवड!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): घाडीगावकर सहकारी पतसंस्थेच्या “संचालक” पदासाठीच्या २०२३-२४ ते २०२७-२८ या पंचवार्षिक कालावधीसाठी निवडणुका नुकत्याच पार पडल्या. नवनियुक्त संचालकांच्या पहिल्या सभेत रघुवीर शांताराम वायंगणकर यांची अध्यक्षपदी तर सहदेव सीताराम दाभोळकर यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमती राखी गावडे सहाय्यक निबंधक, सहकार विभाग, महाराष्ट्र शासन यांनी काम पाहिले.या पतसंस्थेच्या ५ शाखा असून ८ कोटी खेळते भाग भांडवल आहे.

रघुवीर वायंगणकर हे यावेळी तिसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत. त्याबद्दल सर्व सभासदांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर संचालक पदावर सर्वसाधारण प्रवर्गातून अशोक भिकाजी घाडी, भाऊराव विष्णू घाडीगावकर, रामचंद्र शंकर घाडीगावकर, रुपेश चंद्रकांत पारधी, महिला राखीव प्रवर्गातून रेखा अनिल चराटकर आणि अनि सोनू घाडीगावकर व इतर मागास प्रवर्गातून दीपक तुकाराम धावडे हे संचालक निवडून आले आहेत. सर्वांचे अभिनंदन होत आहे.


Spread the love

Related posts

आर्यारवी एंटरटेनमेंट तर्फे आंतरराष्ट्रीय लघुपट सोहळ्याचे आयोजन…!

news

राज्य शासनाच्या वतीने दशावतार प्रशिक्षण शिबिर!

news

विकासाचे व्हिजन असलेले आमदार वैभव नाईक साहेब नमस्कार…!

news

Leave a Comment